अन्य

अहमदनगर विळद फाटा ते पुणतांबा फाटा कोपरगाव रस्ता दुरुस्ती साठी अवजड वाहन वाहतुकीस 15/30 /10/2022 पर्यायी मार्गत बदल करण्यात येणार

Spread the love

गणेश बत्तासे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , कोपरगांव

                राष्टीय महामार्ग प्राधीकरण भारत सरकार अहमदनगर यांनी अहमदनगर ते मनमाड महामार्गावरील विळद फाटा ते पुणतांबा फाटा या मार्गावर प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे बाबत विनंती केलेली आहे विळद बायपास चौक ते पुणतांबा या हायवे महामार्ग दुरुस्तीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यतय येऊन वाहतूक कोंडी होतआहे सध्या पावसाळा सुरु असून दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत आहे त्याच प्रमाणे अवजड वाहनांमुळे अपघात होऊन कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण होऊन नये या दृष्टीने अहमदनगर मनमाड या महामार्गावरील विळद घाट ते पुणतांबा फाटा पोवेतो अवजड वाहतूकी मध्ये दिनांक 15/10/22 ते 30/10/22 रोजी 24:00 वाजे पोवोतो खालील प्रमाणे बदल करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

                     ( 1 )अहमदनगर /पुणे /सोलापूर कडून मनमाड कडे जाणारे सर्व प्रकारचे अवजड वाहतुकीस विळद बायपास चौक येथून मनमाड कडे जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असून त्यानी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा कल्याण बायपास चौक अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा संगमनेर मार्ग नासिक कडे किंवा विळदघाट दूध डेअरी चौक शेंडी बायपास अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरून कायगाव गंगापूर वैजापूर येवला मार्ग मनमाड अवजड वाहतुकी मध्ये बदल करण्यात येत आहे(2 ) मनमाड येवला कडून अहमदनगर/पुणे सोलापूर /बीड कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीस पुणतांबा फाटा येथून अहमदनगर कडे येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे सदर रोडवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूकीस पुणतांबा फाटा येथून वैजापूर गंगापूर कायगाव प्रवरासंगंम शेंडी बायपास विळदघाट केडगाव बायपास मार्ग जातील प्रस्तुत आदेश बस अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने रस्ता दुरुस्तीकरिता आवश्यक वाहने व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणासाठी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत