सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक
नुकतीच वयाची शंभरी गाठलेले त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष पंचायती व आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्रंबकेश्वर येथील श्री स्वामी सागरनंद आश्रमात आज (शनिवार) सकाळी ६:४५ वाजता ते ब्रह्म लिन झाले. मृत्यू समयी त्यांनी वयाचे १०१ वर्ष पार केले होते असे आश्रमतील साधूंनी सांगितले.
स्वामी सागरानंद महाराज यांच्या ब्रह्मलीन होण्याने त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यातील सूर्य मावळला. त्रंबकेश्वर येथील गणपत बारीतील स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आश्रमातून वरील माहिती स्वामी शंकरानंद सरस्वती व गणेशानंद सरस्वती यांनी दिली.
गेले काही महिन्यांपासून स्वामीजी आजारी होते. नाशिक मध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. आजारपणामुळे ते आश्रमाबाहेर पडत नव्हते.
आश्रमातील साधुमंहतांनी त्यांची मोठी सेवा केली पण अखेर आज त्यांचे देव लोकं गमन झाले सहा दशक त्र्यंबक नगरीच्या अध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी साधू ऋषीतुल्य म्हणून त्यांची ओळख होती.
त्र्यंबकच्या सहा कुंभमेळ्यासह ईलाहाबाद, प्रयाग, हरिद्वार अशा एकूण १९ कुंभमेळ्यात ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्ञानवृद्ध, तपस्वी जूने जाणते महंत अशी ख्याती आहे. सुरूवातीला भारतातील अन्य कुंभमेळ्यात ते सामील होत असत.
२०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली पाहिजे. पण येत्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी काही गोष्टी देवाच्या हातात असतात असे त्यांनी अलिकडेच १२ सप्टेंबर रोजी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलं होते. या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवात ते सामील झाले होते. अलीकडे गजलक्ष्मी माता मंदिरात दर्शनाला आले असताना त्यांचे दर्शन भाविकांना झाले.
शंकरानंद सरस्वती उर्फ भगवान बाबा हे गेली ५० वर्ष त्यांचे सोबत आहे. शंकरानंद सरस्वती हे अखिल भारतीय आखाडा परिषदेवर सचिव होते. गणेशानंद सरस्वती, स्वामी गिरिजानंद सरस्वती, सर्वनंद सरस्वती, केशवानंद सरस्वती, रामानंद सरस्वती हे साधू गण त्यांच्या सेवेत असतात.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037