अन्य

पुणे भिडे पुलाजवळ नदीपात्रात झालेल्या हत्येचा तपास डेक्कन पोलीसानीं तीन आरोपीनां अटक करण्यात आली

Spread the love

रक्षक डी अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे 

                  भिडे पुलाजवळील नदीपात्रात मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाच्या हत्येचा तपास डेक्कन पोलिसांनी केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काकाने साथीदारांच्या संगनमताने तरुणाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. नरेश गणेश दळवी अजय शंकर ठकार समीर कैलास कारके राहणार सर्व उर्से, ता. मावळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश सुरेश कदम रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ, पुणे असे मृताचे नाव आहे. आरोपी नरेश गणेश हा कदमचा चुलत भाऊ आहे. कदम यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी २६ सप्टेंबर दुपारी भिडे पुलाजवळील नदीपात्रात पडून कदम यांचा मृत्यू झाला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. डेक्कन पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण व तांत्रिक तपासात आरोपी उर्से भागातील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून तीन आरोपी दळवी, ठकार, कारके यांना ताब्यात घेतले. दळवी आणि कदम यांच्यात वादावादी झाली.होती तिघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत