अश्विनी उगले व तेजस्विनी सावंत मुंबई पोलीस दलात भरती. कणकोरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.
प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर सिन्नर-(कणकोरी), तालुक्यातील कणकोरी गावच्या कन्या अश्विनी आनिल उगले व तेजस्विनी नवनाथ सावंत या मुंबई पोलीस दलात भरती झाल्या असून त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आहे. असे वाक्य गावातील प्रत्येकाच्या ओठावर बोलल्याचे दिसत आहे.तसेच तेजस्विनी नवनाथ सावंत या मुलीचे वडीलांचे एका अपघातात निधन झाले होते. या मुलीला पितृछत्र नसतानाही मेहनत व जिद्दीच्या जोरावर पोलीस होण्याचा मान मिळवला आहे. दोन्ही कन्या अतिशय गरीब परस्थिती वर मात करून सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदय भाऊ सांगळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या अभ्यासिकेत दररोज नांदूर शिंगोटे येथे पोलीस भरती चा अभ्यास करण्यासाठी जात होत्या. कणकोरी ते नांदूर शिंगोटे ०६ किलोमीटर अंतर असून बसेस किंवा रिक्षा कमी प्रमाणात चालतात.परंतु कधी पायाने चालत त्यांनी पोलीस भरती चा आभ्यास करून मेहनत सार्थकी लावली.तसेच उदय भाऊ सांगळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या अभ्यासिकेत आत्तापर्यंत परिसरातील सात ते आठ मुलांची वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मध्ये निवड होऊन ते वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे. अशी चर्चा परिसरात चालू आहे.
कणकोरी गावच्या त्या कन्या असल्याने गावातील ग्रामस्थांचे कुठे तर देनं लागतं त्यामुळे अश्विनी व तेजस्विनी यांचा भव्य असा सत्कार समारंभाचा कार्यक्रम कणकेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संकेत सानप. यांनी दोघीनां शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिवराम विष्णू सांगळे . अनंत जगताप, गणेश दत्तु सांगळे.ह.भ.प.सुनील महाराज जगताप. दगु मुरलीधर सांगळे, सोमनाथ खांडगे. सांगळे, जेष्ठ नेते दादाहरी शिवराम सांगळे. लहानू जगताप.माजी सरपंच संजय सुर्यवंशी, संदीप वसंतराव सांगळे. युवा नेते दशरथ काशिनाथ सावंत.प्रकाश (नाना) बुचकूल.आनिल बुचकूल.(ग्रा.रो.से.),रोहिदास जगताप.नितीन जगताप, चंद्रकांत पोपट सांगळे, आण्णा कारभारी उगले.नवनाथ बुचकूल, व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.