जे.एम.सी.टी.नासिक पॉलिटेक्निकचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशप्रतिनिधी माजिद खान नासिक इंटर इंजीनियरिंग स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन ई २ झोन मध्ये गुरुगोविंद सिंग पॉलिटेक्निक व मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, हिरवाडी रोड, पंचवटी, नाशिक येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जे.एम.सी.टी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
सदर स्पर्धेत जे.एम.सी.टी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी IEDSSA SPORTZ Zonal Tournament २०२४/२५ मध्ये लांब उडी Long Jump व उंच उडी High Jump या स्पर्धेत तौकीर शेख या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावले. मुलींच्या स्पर्धेमध्ये भालाफेक (Javelin Throw) या गटात सारा नाझ शरीफ खान या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकावले.
जे.एम.सी.टी संस्थेचे अध्यक्ष श्री. हाजी हाफिज हिशामुद्दीन खतीब, सचिव श्री. हाजी जाहीद मोहम्मद खतीब, संचालक श्री. हाजी रऊफ पटेल व श्री. हाजी साबीर खतीब, श्री. ऐहसान खतीब. जे. एम. सी. टी. कॅम्पस डायरेक्टर श्री. डॉ. आरिफ मंसूरी, जे एम सी टी तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. अब्दुल हमीद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा समन्यक मिलिंद कलगुंडे, अब्दुल कादिर जामदार व शारमीन शेख, अशरफ तुर्की, व अरफात खान यांनी मार्गदर्शन केले.