क्रांतिवीर व्ही,एन,नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर दि ०६/०२/२०२५- सिन्नर शहरातील आडवा फाटा येथील वसंतराव नारायणराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अनुक्रमे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले यांच्या हस्ते झाले. तसेच संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड व संचालक समाधान गायकवाड उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून गोरक्ष सांगळे, प्रा. मंजुश्री उगले व संतोष दराडे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सागर वैद्य (सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड व संस्थेचे संचालक हेमंत नाईक व समाधान गायकवाड व डोंगरे सर उपस्थित होते तसेच परीक्षक गोरक्षनाथ सांगळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की परीक्षण करणे कठीण होते. कारण अर्ध्या गुणांवरून फरक पडत होता. परीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली. तसेच सागर वैद्य यांनी महाविद्यालयाची प्रगती होईल असे उपक्रम राबविले जात असल्याचे असे मत नोंदविले. असे उपक्रम महाविद्यालयाचे भविष्य उंचाविणारे असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमोल आव्हाड व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. मंगल सांगळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास सांस्कृतिक अधिकारी प्रा. पूनम कुटे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. डॉ. ज्योती गायकवाड, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, IQAC समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर चकोर, विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.