कर्मवीर गणपत दादा मोरे विद्यालयाचे रेखाकला परीक्षेत घवघवीत यश प्रतिनिधी रवी जगताप पिंपळगाव
पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत एलिमेंट्री ग्रेट चा निकाल 100 टक्के तर इंटरमिजिएट ग्रेट चा निकाल सुद्धा 100टक्के लागला आहे.
एलिमेंट्री परीक्षेसाठी 48 विद्यार्थी समाविष्ट झाले होते त्यात अ श्रेणी 06 , ब श्रेणी 06, क श्रेणी36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तसेच इंटरमिजिएट परीक्षेसाठी 15 विद्यार्थी समाविष्ट झाले होते. त्यात अ श्रेणी02, ब श्रेणी 03, क श्रेणी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक श्री अनिल शिरसाठ तसेच कला शिक्षिका संध्या पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासरावजी मोरे साहेब, शालेय समिती अध्यक्ष श्री जयराम भाऊ मोरे सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय डेर्ले सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला डंबाळे मॅडम विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कौतुक केले.