पोलीस आयुक्तालय नाशिक यांच्या व्दारे २४ ते २६ जानेवारी दरम्यान CCTV EXPO चे आयोजन. नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस दलासही नविन तंत्रज्ञानाची मदत होत आहे. मागील काही वर्षाच्या कालावधीत वाढलेल्या CCTV च्या जाळयामुळे गुन्हे प्रतिबंध होत असुन गुन्हे उघडकीस येण्यासही मदत होत आहे.
यामुळेच मा. श्री संदिप कर्णिक पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुरू केलेल्या सुरक्षीत नाशिक मोहीमे अंतर्गत शहरातील सर्व व्यावसायीक आस्थपनांना आपल्या आस्थापणेच्या आत तसेच बाहेरील परिसरातही CCTV लावणे बाबत आवाहन केले आहे.
सुरक्षीत नाशिक मोहीमेचा भाग म्हणुन शहरातील नागरीकांना नाशिक शहरात सेवा देत असलेल्या CCTV कंपणीची माहीती व्हावी या उद्देशाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सिटी सेंटर मॉल येथे दिनांक २४ ते २६ जानेवारी या कालावधीत CCTV EXPO ” चे आयोजन करण्यात आले आहे. या CCTV प्रदर्शनात PRAMA, HIKVISION, CP PLUS, MATRIX, TRUEVIEW, UNIVIEW, USN या नाशिक शहरात CCTV बाबत सेवा देणाऱ्या कंपन्या आपले स्टॉल लावणार असुन याच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध CCTV तंत्रज्ञानाची प्रात्यक्षीक माहिती संबंधीत कंपन्यांकडुन दिली जाणार आहे. या माहीतीचा वापर करून नागरीक त्यांचेसाठी सुयोग्य CCTV निवडुन त्याचा वापर करू शकतील. या प्रदर्शनास भेट देवून CCTV निवडणे बाबत १) ज्वेलर्स २) मॉल्स् / सुपर शॉपी ३) शाळा / महाविदयालय / कोचिंग क्लासेस ४) हॉस्पीटल ५) रेस्टॉरन्टंस् ६) हॉटेल्स् ७) इलेक्ट्रॉनिक्स् ८) बँक / वित्तीय संस्था ९) बार वाईन शॉपस् १०) सोसायटी चेअरमन ११) कार मॉल्स / व्हेईकल शोरूमस् १२) लॉन्स् १३) मंदिरे १४) कापड दुकान / शोरूम अशा व इतर संस्थांना नाशिक शहर पोलीसांकडून आमंत्रीत करण्यात येत आहे.
या CCTV EXPO” चे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर श्री. संदिप कर्णिक यांच्या हस्ते दिनांक २४/०१/२०२५ रोजी १२:०० वा. होणार आहे. तरी या प्रदर्शनास भेट देऊन सुयोग्य CCTV कॅमेरे निवडुन नाशिक पोलीस आयुक्तालाच्या सुरक्षीत नाशिक’ मोहीमेत सहभागी होणेबाबत पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आवाहन केले आहे.
मा. पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली नमुद प्रदर्शन भरवण्यासाठी श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १. श्री. नितिन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, पोनि/सुशिल जुमडे, गंगापूर पोलीस ठाणे, सपोनि/तुषार देवरे व सपोनि / संदिप चोपडे यांनी परिश्रम घेतले आहेत.