मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम नागरिकांना आव्हान
प्रतिनिधी शाहीद शेख मालेगाव मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमास अनुसरून नाशिक ग्रामीण पोलीस दलात दर शनिवारी होणार तक्रार निवारण दिनाच्या अंमल दिनाची अंमलबजावणी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्यांमध्ये शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आखाडा निश्चित केलेला असून त्या धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निम शासकीय कार्यालयाकरीता आगामी १०० दिवसांमध्ये खालील प्रमाणे ०७ कलमी कृती आराखडा तयार करून त्या मुद्द्यावर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत त्या अनुसरून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे खालील प्रमाणे सुविधा पुरवण्याबाबत प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय यांचे कार्यालयात नागरिकांना त्यांचे तक्रारी / अडचणी करीता समक्ष भेटण्याची वेळ दुपारी ०३/३०वा ते ०५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे लोकशाही दिनानिमित्त आठवड्याच्या शनिवारी जिल्ह्यामधील प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार असून सदर वेळी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तत्सम वरिष्ठ अधिकारी हजर राहून नागरिकांच्या तक्रारीची जागीच दखल घेऊन पुढील कार्यवाही करून तक्रारीचे निरसन करणार आहेत तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून कार्यालयास/ पोलीस ठाणे प्रत्यक्ष अथवा (आपले पी.जी. पोर्टल शेतकरी सेल ) या माध्यमाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन निसरण करण्यात येईल शनिवारी सकाळी १०. ०० ते ०१. ०० वा.दरम्यान तक्रार निवारण आयोजित करण्यात येईल तरी नाशिक ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी कोणाच्याही काही तक्रारी असल्यास अगर काही तक्रारी प्रलंबित असल्यास संबंधितांनी तक्रार निवारण दिन कार्यक्रमाचे उपस्थित राहून तक्राराची निसरण करून घ्यावे असे आव्हान श्री विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण. श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक व श्री अनिकेत भारती अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी केलेले आहे