भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जव्हार. विद्यालयाचा जिल्हास्तरिय विभारती ज्ञान प्रदर्शन स्पर्धेत सुयश प्रतिनिधी प्रशांत वांगड जव्हार जव्हार ,भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जव्हार. विद्यालयाचा जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय निवड* शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद पालघर, पालघर जिल्हा ” गणित – विज्ञान अध्यापक मंडळ व आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूल, पालघर”येथे बुधवार दिनांक १५/०१/२०२५ ते शुक्रवार दिनांक १७/०१/२०२५ रोजी ५२ वे पालघर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, या विज्ञान प्रदर्शनात”*शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान*” या विषयावर वैज्ञानिक उपकरणांमध्ये पालघर जिल्ह्यातून विविध शाळांनी सहभाग घेतला होता.या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातून आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून”*भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जव्हार*”.या विद्यालयाचा *चि.सुजल संजय बुधर* (इयत्ता ११ वी विज्ञान) याने तयार केलेल्या *’ जीओ थर्मल कुलींग सीस्टीम’* या उपकरणास माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मिळविला. भारती विद्यापीठ प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. तरवारे के. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यास मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री. योगेश राऊत,