32 वां.आदिवासी सांस्कृतिक एकता महा संमेलन निमित्त महात्मा रावण किंग फाऊंडेशन व आदिवासी उलगुलान सेनेच्या पदाधिकारी यांची भेट.प्रतिनिधी सनी गोसावी निफाड आदिवासी सांस्कृतिक एकता संमेलन मध्ये आपली परंपरा , बोलू भाषा, कश्या पद्धतीने टिकून राहतील आणि सर्वात महत्वाचे तेथे आदिवासी समाजाची एकता दिसून आली.!
आपल्या आदिम चालीरिती, वेशभूषा, आपल्या पारंपरिक वाद्यसह आपले शेकडो पथक आपली कला सदर करण्यास हजेरी लावली होती, आदिवासी समाजात रावणाला मानणारा समाज आहेत रावणाच्या ताटीने बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.आपली आदिवासी संस्कृती परंपरा जोपासण्याची आवड सर्व हजारो समाज बांधवामध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले..
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे मार्गदर्शन करत आपल्या अनुयायांनी आपले मनोगत व्यक्त केलेत ..
तसेच आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात सिमेंवर वसलेले आदिवासी समाजाचे कुलदैवत डोंगरदेव धनसऱ्या, कणसारा माता यांचे देवस्थान असुन तेथील दर्शनाचा योग आला..
जल जमीन जंगल पुजणारे आदिवासी समाजाचं निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाशी असलेले एक नातं, हें किती मैलिक आहेत हें जिवंत उदाहरणं,, बघायला मिळालं..
त्या वेळी महात्मा रावण किंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, व आदिवासी उलगुलान सेनेचे दत्तु झनकर, पिंपळगाव शहर अध्यक्ष संदीप ठाकरे जनार्दन कडाळे, तुषार वाघ, सोनू सापटे, योगेश सापटे. जिल्हाध्यक्षा शारदा ताई प्रतिके, तालुका महिला अध्यक्षा ललिता ताई खांडवी, वंदना पवार, शहर अध्यक्षा विट्टाअक्का पवार, कमल खराटे, संगीता कराटे, मनीषा झनकर. लक्ष्मी डंबाळे, भाग्यश्री महाले,आदी. उपस्थित होते…