डाक सेवा जन सेवा भारतीय डाक विभागातर्फे डाक तिकीट प्रदर्शनासाठी महापेक्स सायकल रॅलीचे जोरदार स्वागत, प्रतिनिधी सोनाली शेजवळ
भारताची सायकल राजधानी नाशिक मध्ये महापेक्स सायकल रॅलीचे जोरदार स्वागत…. भारतीय डाक विभागातर्फे कुलबा, मुंबई येथे 22 ते 25 जानेवारी रोजी डाक होणाऱ्या डाक तिकीट प्रदर्शना च्या प्रचारा करिता “डाक सेवा जन सेवा ” हा नारा देत निघालेल्या सायकल रेली चे आज पुन्यभुमि नाशिक मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले .या इलेक्ट्रिक सायकल रॅली चा सायकल चालक अक्षय शेळके व स्वप्निल पवार यांच्या सोबत छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या सायकल रॅली ची सुरुवात प्रफुल्ल वाणी सर ,वरिष्ठ अधीक्षक डाकघर नाशिक . यांनी हिरवा झेंडा दाखवून केली हि रॅली नाशिक रोड रेल्वे डाक सेवा कार्यालया कडे रवाना झाली तेथे डाक सहाय्यक गुलाब खर्डे व कर्मचाऱ्यांनी सायकल रेली चे स्वागत केले ,बुद्ध विहार येथे तथागतास फुले अर्पण करून व डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ही रॅली डाक प्रशिक्षण केंद्र उपनगर कडे रवाना झाली ,या सायकल रॅली सोबत नाशिक मधील सायकल खेळाडू सद्भवना सैनिक रत्नाकर शेजवळ, डाक सहाय्यक अभिजित वानखेडे सहभागी झाले त्यांनी सायकल चालवून “डाक सेवा जन सेवा” हा नारा देत सायकल रॅली ला पुढील प्रवसासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी श्री नागेश खैरनार पोस्टमास्तर नाशिक रोड प्रधान डाकघर श्री प्रशांत मालकर सहाय्यक अधीक्षक श्री विशाल निकम सहाय्यक अधीक्षक श्री गोपाळ पाटील सहाय्यक अधीक्षक तसेच पोस्टमन व डाक कर्मचारी मोठ्या प्रमाणात या सायकल रॅली मध्ये सहभागी झाले होते.