आम्ही लोक आणि हिंस्त्र कळपांच्या कविता कवितासंग्रहावर परिचर्चा ११/१/२५जेलरोड नासिक रोड ला आयोजित “प्रतिनिधी रत्नदीप जाधव नासिक रोड जेष्ठ साहित्यिक, कवी प्रा. गंगाधर अहिरे यांच्या ‘आम्ही लोक आणि हिंस्त्र कळपांच्या कविता’ या कवितासंग्रहावर परिचर्चा संपन्न होणार आहे. म. फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय (जेलरोड ), नाशिकरोड येथील, ‘आंबेडकर भवन सभागृहात’ शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५-३० वाजता सदर परिचर्चा आयोजित आहे.
परिचर्चेत ‘आम्ही लोक आणि हिंस्त्र कळपांच्या कविता’ या कवितासंग्रहावर प्रा. डॉ. मनिषा डोंगरे ( एचपीटी महाविद्यालय, नाशिक ) या भाष्य करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रविण घोडेस्वार ( य. च. म. मुक्त विद्यापीठ, नाशिक) हे भूषविणार आहेत. प्रास्तविक जेष्ठ विचारवंत अॕड.विजय निरभवणे करणार असून, काव्यसंग्रहाचे कवी प्रा. गंगाधर अहिरे हे कवितावाचनासह भूमिका विषद करणार आहेत. नामवंत निवेदक किशोर शिंदेसर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. आभारप्रदर्शन संस्थेचे विश्वस्त आयु. आर. के. जाधव करतील.
या कार्यक्रमास आपण अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष सुधीर भालेराव सरचिटणीस कुणाल शेजवळ व कोषाध्यक्ष चंद्रकांत हिरे यांनी केले आहे.