शिक्षा

आसिफ शेख सर यांना शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर

Spread the love

आसिफ शेख सर यांना शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर प्रतिनिधी प्रिती पटेल नासिक

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दि. ५ जानेवारी २०२५ रोजी नाशिक येथे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नाशिक येथील करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शब्बीर शेख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
होरायझन अकॅडमी सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पुणे येथील गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, म.वि.प्र. समाजाचे सरचिटणीस ऍड.नितीन ठाकरे, नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत, राजस कॉन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश उपासनी, मॉडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉ. ज्योती केदारे शिंदे, दिनकर शिलेदार, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी व अजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सरांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत