नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणा-या इसमावर मुंबईनाका पोलीसांची कारवाई.
नाशिक प्रतिनिधी: माजिद खान
नाशिक शहरात व परिसरात नायलॉन मांजा बाळगणा-या व विक्री करणा-या इसमांवर कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक सर यांनी आदेश दिलेले होते. त्यानुसार पोलीस उपआयुक्त, परिमंडळ- १, श्री. किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त, विभाग- २ श्री. नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष नरूटे यांचे मार्गदर्शनाखाली सुचना देण्यात आलेल्या आहे.
त्यानुसार ३१/१२/२०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजता अंमलदार/२४४५ गणेश बोरणारे
यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की रॉयल कॉलनी येथे एका ईमारतीच्या जवळ एक ईसम पतंग उडविण्यासठी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करित आहे सदर बाबत वरीष्ठांना माहीती देवुन त्यांच्या सुचनेनुसार पथक खाना केले. त्यानुसार दिनांक ३१/१२/२०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजेच्या सुमारास रॉयल कॉलनी नासिक येथे एका ईमारतीच्या जवळ गेलो असता सदर ठिकाणी एक ईसम त्याचे हातात एक प्लास्टीक गोणी सह पथकास दिसला सदर ईसमाचे जवळ जाउन ०९.४० वाजता छापा टाकला असता सदर ईसमाचे हातात एक प्लास्टीक गोणी दिसली त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव समीर सलीम शेख, वय ४२ वर्षे, व्यव पेटिंग, राहणार- फ्लॅट नं इ विंग ४०३, गरीब नवाज कॉलनी, सिग्नीफिकेन्ट सोसायटी, वडाळागाव नाशिक असे सांगीतले. त्यानंतर त्याचे ताब्यातील प्लास्टीक गोणीची तपासणी केली असता सदर प्लास्टीक गोणीत बंदी असलेले मोनो कंपनीचे नायलॉन मांजाचे २२ गटटु मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन सदर १३,२००/- रूपये किमतीचे मुददेमाल जागीच पंचासमक्ष सहा. पोलीस उपनिरिक्षक सोनार यांनी पंचनामा करून दोन पंचासमक्ष ताब्यात घेतला असुन त्याचेविरूदध मुंबईनाका पो. ठाणे येथे ३९५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २२३,२९२,२९३ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५/१५ अन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहापोउपनिरी / रोहीदास सोनार करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक सो, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१ श्री. किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त, विभाग-२ श्री. नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष नरूटे यांचे मार्गदर्शनाखाली मुंबईनाका पो. ठाणे चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी स.पो.नि. सतिश शिरसाठ, सपोउनि / रोहीदास सोनार, पोहवा /६३७ देविदास गाढवे, पोअं/१९९७ फरिद इनामदार, पोअं/२४४५ गणेश बोरनारे, पोशि/ २४३९ नवनाथ उगले, पोशि/२२८४ आकाश सोनवणे अशांनी केली आहे