परभणीतील घटनेचा चांदवड येथील महिलांकडुन निषेध ! निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा
*प्रतिनिधी सनी गोसावी निफाड*
परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणा-या देशद्रोही संविधानद्रोही आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी व चांदवड येथील महिला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आणि महिला स्वाभिमानी समितीतर्फे निवेदनव्दारे करत परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
परभणीत संविधानाच्या प्रतिकृती तोडणा-या देशद्रोही संविधानद्रोही आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.
तसेच नेहमीच दलित बौध्द समाजातील तरूणांना महिलांना जाणीवपूर्वक लक्ष बनवून, अमानुषपणे मारहाण करणा-या,भाजपा आर.एस.एसच्या,शासनकर्त्या पोलीस अधिका-यांना व कर्मचा-यांना निलंबित करावे.
वारंवार दलित बौध्द समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे.
अन्यायकर्त्यांना आणि सदर घटनेच्या पाठिमागे असणा-या मास्टरमांईड आरोपींना कठोर शासन व्हावे.अन्यथा महिला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आणि महिला स्वाभिमानी समिती चांदवडतर्फे न्यायासाठी तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल.आणि होणा-या परिणामास पक्षपाती,जातीवादी हिंसाचारी मनुवादी हुकूमशाहीवादी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,आणि अन्यायकर्ते पोलीस प्रशासन जबाबदार राहिल! असे निवेदन चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना देण्यात आले.
सौ.मायाताई निरभवणे, माधुरी निरभवणे,अलका प्रभाकर बनकर, सिद्धार्थ कुणाल बनकर, संकेत महेंद्र शेजवळ, आदित्य हिरामण वाघ, रूपाली कुणाल निकम, शबाना अस्लम तांबोळी, परवीन अनिस तांबोळी, सुनिता निरभवणे, आशा दिलीप निकम, ज्योती दिलीप निकम, बेबी सुभाष बनकर, अंजली संजय बनकर, भीमा संतोष जाधव,रमा भास्कर बनकर, नाना नामदेव बनकर, विणा रवींद्र बनकर,
निवृत्ती राम बनकर, अलका सुनील बनकर, पूजा भूषण बनकर, देवयानी राहुल निरभवणे, बेबीताई सोमनाथ जाधव, अनिता सिद्धार्थ केदारे, ज्योती काशिनाथ सूर्यवंशी, सरला आहिरे, वंदना प्रमोद जाधव, सुरेखा संजय मोरे, प्रज्ञा संजय भडांगे, संगीता महेंद्र भडांगे, मंदा साळवे.
आदी देशभक्त भारतीय संविधान प्रेमी महिला पुरूष कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते!