नुरिया फैजाने सादिक ट्रस्ट तर्फे मेरे नबी प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
नाशिक शहरातील मौलाना अबुल कलाम शाळा, घास बाजार येथे मदरसा नुरिया फैजाने सादिक, नाशिक व हादीया मॉरल स्कुल, भिवंडी यांचे विद्यमाने मेरे नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील शाळा व मदरशामधून विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी नाशिकचे खतीब शहर हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. नानावली मस्जिदचे मौलाना शाकीर रजा, जहांगीर मस्जिदचे मौलाना सय्यद शरीफ, हाफिज मोहम्मद हुसेन, मौलाना अब्दुल काबीज, माजी नगरसेवक सुफी जीन, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
आसिफ शेख सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी भविष्यात अधिक मेहनत घेऊन प्रगती करावी व स्पर्धेच्या युगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे मार्गदर्शन केले. गुलजार कोकणी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हादीया मॉरल स्कुल, भिवंडी चे इरशाद हुदवी, मुजम्मिल हुदवी, नसीम अख्तर नुरी, फ़झल शेख यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या व्यवस्थापनाचे काम बघितले.
रहनुमा उर्दू प्रायमरी शाळेची फातेमा नदीम तांबोळी हिने प्रथम क्रमांक, युझ नॅशनल उर्दू शाळेची उजमा शाकीर शेख हिने द्वितीय क्रमांक, वाय.डी. बिटको शाळेची अल्फीया शफिक शेख हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम तीन विजेत्यांना मोठे सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रशस्ती पत्रके देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रके देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नुरिया फैजाने सादिक ट्रस्टचे अध्यक्ष रजा खतीब, नाजीम शेख, शादाब कोकणी, कादीर शेख, बब्बू शेख, कादीर बाबा, अब्दुल हमीद चोगले, मुशीर शेख, अमीन शेख, फकीर मोहम्मद शेख, रिजवान शेख, फरहान कुरेशी, आसिफ शेख, मोबीन मेमन, आलेमा जुलेखा बाजी, नुसरत बाजी यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव नाजीम शेख यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.