लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर येथे अवैद्य कत्तलखान्यावर चा छापा
आठ लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त
डी वाय एस पी शिरीष वमने यांचे पथक व लोणी पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी
प्रतिनिधी जुल्फेखार शेख नासिक
दि २८/११/२०२४ रोजी शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वमने यांना गुप्त माहिती दारामार्फत माहित मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर येथे काही इसम आपल्या राहत्या घरासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे आणून त्यांना चारा पाण्या वाचून वंचित ठेवून सदर गोवंशजातीचे जनावरांचे कत्तल करीत असल्याचे बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करणे करिता शिर्डीचे डीवायएसपी शिरीष ओमने यांनी पथकातील अंमलदार यांना सोबत घेऊन लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार व पशुवैद्यकीय अधिकारी व पंचासह सदर ठिकाणी छापा टाकून १००० किलो गोवंश जातीचे मास व एक होंडा सिटी गाडी जप्त केलेली आहे सदर ठिकाणचा पंचनामा करून सदर कत्तलखाना चालवणाऱ्या आरोपी आरोपी १) सद्दाम फकीरमंहम्मद कुरेशी राहणार ममदापुर तालुका राहाता २) साजिद युनुस कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता ३) शाहरुख निसार पिंजारी राहणार श्रीरामपूर यांचे विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६३९/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनिमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे
*सदर कारवाईमुळे अवैद्य कत्तलखाने चालवणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत*
*सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मा. श्री* *वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मा.डी.वाय. एस.पी. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली* *सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हेड. इरफान शेख हेड.अशोक शिंदे हेड.साईनाथ राशिनकर हेड.राजेंद्र कांबळे पीएन.सचिन शेवाळे पो कॉ. दिनेश कांबळे चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी नरे व ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले आहे*