दिनेश गोसावी/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता,पिंपळगाव बसवंत
निफाड तालुक्यातील तारुखेडले गावात ७५ व्या स्वातंत्र दिनानिमित येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून देणगी जमा करून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी क्र १ व २ यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले सोशल मिडीया च्या माध्यमातून रु १७,६२४/- एवढी रक्कम दहा दिवसात त्यांनी जमा केली या कामासाठी त्यांनी सोशल मिडीया द्वारे ग्रामस्थ व मित्र मंडळी यांना अहवान केले होते की जी पे व फोन पे द्वारे मदत टाकावी त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला व भरघोस रक्कम जमा झाली या रक्कमेतून त्यांनी शाळा व अंगणवाडी येथील मुलांना पेन, पेन्सिल, रबर, शापनर,पट्टी,पाटी व पेन्सिल, पाण्याची बाटली,अल कंपी, वही, कलर, पाऊच,जेवणाच्या प्लेट व इतर साहित्य वाटप केले व वृक्षारोपण केले अशोका व चिंच ची ३५ झाडे देण्यात आली व ती शाळेच्या आवारात लावण्यात आली मुंबई येथील किरण पुंडलिक चव्हाण व पंकज शरद गवळी यांनी वास्तुरूपी देणगी दिली पेन, रबर, पट्टी, पेन्सिल हे साहित्य दिले एकूण शाळेतील १२४ मुले व मुली तसेच अंगणवाडी येथील ५० मुलांना हे साहित्य वाटप करण्यात आले सोशल मिडीया चा वापर चांगल्या कामासाठी करता येतो हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले या कामासाठी त्यांना त्यांचे मित्र मंडळी यांनी सहकार्य केले गावातील जेष्ठ नागरिक पुंडलिक विठोबा चव्हाण, किरण व किशोर चव्हाण, देविदास व सुभाष जगताप अजित आंधळे व आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रम स्थळी सुरुवातीला भारत देश गीतावर नृत्य करण्यात आले या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण सुनील जगताप व मुख्याद्यापक संदीप गायकवाड शिक्षक अनिल पवार,मदन बिरादार,मच्छिन्द्र जगताप, आरोग्य सेवक, आशा व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थीत होते या वेळी श्री गवळी यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती व अंगणवाडी सेविका यांनी केला शेवटी गवळी यांचे आभार सर्वांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822817037 / 9822117037