गणेश बत्तासे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , कोपरगांव
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथे माजी आमदार मा श्री अशोकदादा काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार मा श्री आशुतोष दादा काळे साहेब यांच्या प्रेरणेने रयत संकुल सुरेगाव कोळपेवाडी येथील.श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर येथे असा कृष्णजन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राधा कृष्ण व बालगोपाळाच्या वेशभूषेत आलेले चिमुकले गोविंदा रे गोपाळा या गाण्याच्या तालावर डोलणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यामुळे शालेय प्रांगणात जणु गोकुळनगरीच अवतरली होती या प्रसंगी तसेच पंचक्रोषीतील बहुसंख्य पालक आपल्या पाल्याचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते इयत्ता पहिली ते चौथी च्या .तसेच बालवाडी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ..तसेच शिक्षक बंधू भगिनीनीही देखील गोविंदा आला रे या गाण्यावर ठेका धरुन आनंद घेतला शेवटी दहीहंडी फोडून विद्यार्थींनी एकच जल्लोष केला काल्याचा प्रसादही विद्यार्थ्यांना वाटण्यात आला तर एक आदर्श म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांना जाणून घेतले तर नक्कीच आपले जीवनही यशस्वी व सार्थकी होईल असे वक्तव्य श्री,छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंन्द्र पाचोरे सर यांनी केले.अशा प्रकारे संगीत नृत्य यामुळे विद्यार्थ्यांबरोबर वातावरणही आनंदाचे उधाण आले होते तसेच विद्यालयात नवनवीन उपक्रम सुंदर प्रकारे राबविले जातात अशा या जल्लोषाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाचोरे सर तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री थोरात सर तसेच शिंदे सर यांनी केले तसेच आभार सौ दवंगे ताई श्रीमती ससाणे ताई श्री बैरागी सर श्री दवंगे सर श्री पंडुरे सर श्री वसावे सर श्री विधाते सर श्री भगुरे सर व इतर या सर्व सेवकवृंद यांनी परीश्रम घेतले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 919822817037 / 919822117037