आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
नाशिक शहरामध्ये मागील काही काळापासून रिक्षामध्ये बसणा-या प्रवाशांचे सामाना मधुन सोन्याचांदीचे दागिने व रोख चोरी होणाच्या वांरवांर घटना घडत होत्या त्या अनुषंगाने सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर व मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, यांनी सक्त सूचना व मार्गदर्शन केले होते. सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेणेकामी त्या भागातील सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रीक माहीतीच्या आधारे शोध घेवून | संमातर तपास करीत होते.
सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दिनांक १४/०७/२०२३ रोजी १७.३० वा. चे सुमारास फिर्यादी महीला या ठक्कर बाजार बस स्थानक ते सी.बी.एस. सिग्नलनाशिक दरम्यान रिक्षाने प्रवास करत असतांना रिक्षात सोबत बसलेल्या अनोळखी | ३ इसमांनी फिर्यादीच्या बॅगमधुन ५,००० /- रोख रुपये व २ बांगडया चोरी करून नेल्या होत्या, त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून गु. र. नं. 1१९० / २०२३ भादवी कलम ३७९, ३४ प्रमाणे दाखल झाला होता.
दि. १५/०७/२०२३ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ चे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना मिळालेल्या तांत्रीक माहीतीच्या आधारे व पो.ना. / ३७७ प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी वरून, रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या बॅगेमधील वस्तूंची वोरी करणारे इसम हे परराज्यातील असुन सध्या ते पुणे नाशिक रोड वरील विजय ममता थिएटर जवळ असलेले लोंढेज गेस्ट हाउस येथे थांबलेले आहेत. अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी मा. वपोनि श्री. विजय ढमाळ यांना देण्यात आली असुन त्यांनी कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने पोलीस अंमलदार, रविंद्र बागुल, संदिप भांड, प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ असे पथक तयार करून लोंढेज गेस्ट हाउस येथे जावुन इसम नामे १) साजीद पिता वाजीद अली वय ३९ वर्षे रा. अब्दुलापुर कुरेशी पो. बढ़ापुर ता. नगीना जि. बिजनोर राज्य उत्तरप्रदेश २) मुस्ताकीन पिता बंदु पस- ३९ वर्षे, गांव गौसपुर सादात ता.नगीना जि. बिजनोर राज्य उत्तरप्रदेश ३) सोनु उर्फ मोहंमद आबिद पिता मंहमद हुसेन शेख वय २८ वर्षे रा. गांव-सबदलपुर देह जांगीर पो. राजोपुर ता. नगीना जि. बिजनोर राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. रेहनुमीया हायस्कुलचे मागे, वडाळा रोड, नाशिक यांना ताब्यात घेवुन वर नमुद गुन्हयाबाबत विचारपुस करता, त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन त्यांचे अंगझडतीत चोरीस गेलेला मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नमुद आरोपी यांना वर नमुद गुन्हयात दि. १५/०७/२०२३ रोजी अटक करण्यात आली, अटके दरम्यान आरोपीतांकडे विचारपुस केली असता त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक शहर येथील आणखी २ गुन्हे उघडकीस आले असुन त्यांचेकडुन ५७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम १५,५००/- हस्तगत करून सरकारवाडा पोलीस ठाणे गु.र.न ७३ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९, ३४ व नाशिकरोड पो. स्टे. गु.र.नं. ३९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९, असे गुन्हे उघडकीस आणले असून एकूण किं.रु. ३,४१,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीताकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा / संदीप भांड, गुन्हे शाखा युनिट १ हे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, डॉ. सिताराम कोल्हे सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ सो, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / विष्णु उगले, सपोउनि / रविंद्र बागुल, येवाजी महाले, पो. हवा / संदीप भांड, प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, पो.ना. / प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, महेश साळुंके, पो. अं. राहुल पालखेडे, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अण्णासाहेब गुंजाळ यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037