अरशद अन्सारी/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता
जव्हार तालुक्यात विविध ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत. काही ठिकाणी पर्यटकांसाठी सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. परंतु काही पर्यटन स्थळे अतिशय भयानक व धोकादायक आहेत.त्या ठिकाणी संबंधित विभागाने कुठलीही सुरक्षेची व्यवस्था केलेली नाही. त्यातील एक काळ मांडवी धबधबा आहे. काळ मांडवी धबधब्याची वॉटरफॉल youtube वरील स्टोरीचा पाठलाग करत मुंबई जोगेश्वरी येथील एक तरुण मशीउद्दीन सलाउद्दीन खान व त्याच्या बरोबर तीन तरुण मित्र फिरायला गेले. जेव्हा ते चार तरुण काळ मांडवी धबधब्यासमोर आले तर अक्षरशः बघूनच घाबरले हे काय आहे. आपण युट्युबवर बघितला ते किती सुंदर होतं आणि हे किती भयानक आहे आता प्रश्न पडला करायचा काय मुंबईवरून बसमध्ये पाच तास प्रवास करून जव्हार बस स्टॅन्डला आले.तिथून जव्हार ते झाप बस पकडली व काळ मांडवी फाट्यावर उतरून तिथून चार ते पाच किलोमीटर पायी चालून जंगलात काळ मांडवी येथे पोहोचले आता समोर भयानक दृश्य दिसत आहे पुढे जाऊ का मागे जाऊ काय करावं सुचत नव्हतं. लांबून आले होते करणार काय पुढे गेले खालती उतरायला घाबरत होते कारण खालती जायला कुठलाच आधार नव्हता. जीव मुठीत घेऊन कसरत करून कसंतरी खालती पोहोचले. पाण्यासमोर आले आणि निसर्गाची मजा घेण्याची सुरुवात केली फोटो काढत असताना चिकण्या दगडावरून मशीउद्दीन सलाउद्दीन खान त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रभावामुळे पाण्यात वाहून गेला. त्याला वाचवणार कसं व कोण तिथे काहीच सुरक्षेची व्यवस्था नाही पर्यटकांच्या मदतीसाठी कोणीच नाही. शेवटी एका १७ वर्षाच्या तरुणाला युट्युबचा पाठलाग करत आलेल्या निसर्गाच्या ठिकाणी जीव गमवावा लागला पुढे त्याचा शोध सुरू झाला जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे स्वता , उप पोलीस निरीक्षक अनिल दिघोडे , व उप निरीक्षक खादे साहेब, पोलीस नाईक राठोड सर , पोलीस हवालदार शंकर पढेर , पोलीस हवालदार राजू नेहेरे, पोलीस नाईक दिनेश भोईर ,पोलीस शिपाई संजय दराडे, पोलीस नाईक हेमंत दामशे, पोलीस हवालदार प्रदीप विटकर . यांच्याबरोबर आपटाळा ग्रामपंचायतचे सरपंच कैलास पागी व स्थानिक गोताखोर सुरेश व बारकु व स्थानिक आदिवाशी बांधव अशाप्रकारे सर्वांनी दिवस-रात्र काळमाडवी धबधब्याच्या परिसरात सतत २४ ते २८ तास सतत मेहनत घेतली आणि दोन दिवसांनंतर पाण्यात बुडालेला इसमाचा प्रेत (बॉडी) नदीतून बाहेर काढला व त्या नदीतून स्थानिक आदिवाशी बांधवांनी जव्हार पोलिसांच्या मदतीने एक हजार ते दोन हजार फूट डोंगर चढून अतोनात परिश्रम घेऊन त्याला रस्त्यावर आणले व पोलिसांनी त्याला जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले. सरकारी दवाखान्यात डॉक्टर राजगुरू सरांनी त्याचे पोस्टमार्टम केले व जव्हार पोलिसांनी पंचनामा करून मुंबईवरून आलेले त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत दिला. तसेच काळ मांडवी धबधबा हा लांबून देखावा सुंदर आहे परंतु त्या ठिकाणी संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था केलेली नाही. गेल्या वर्षभरामध्ये या ठिकाणी ९ पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये जव्हार शहरातील पाच तरुणांचा बुडून मृत्यू झालेला आहे आणि म्हणून ग्रामपंचायत आपटाळे संबंधित विभाग व जिल्हाधिकारी पालघर तसेच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर जिल्ह्याचे पालक मंत्री महोदयांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. जोपर्यंत सुरक्षेची व्यवस्था होत नाही तोपर्यंत प्रशासनाने व पोलीस विभागाने या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी लावावी. अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक करत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037