अन्य

हातचलाकी करून ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना फसवून रक्कम काढणारा आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                  स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी सोलापूर जिल्हयात असलेले ए.टी.एम सेंटर मध्ये ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून मोठया प्रमाणात नागरिकांची फसवणूक केली जात असल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने मा. श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, मा. श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. सुरेश निंबाळकर यांना सदर गुन्हयांचा आढावा घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर यांना गुन्हयांचा अभिलेख तपासून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

               त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर व पथक यांनी ए.टी.एम सेंटरमध्ये ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना फसवुन त्यांचे बँक अकाऊन्टमधून रक्कम काढणा-या आरोपींबाबत माहिती घेत असताना, सी. सी.टी.व्ही फुटेज याचे विश्लेषण केले करून उपयुक्त माहिती मिळाली होती. त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंदुप पोलीस ठाणे, गुरनं ५७/२०२३, भादविक ४२० प्रमाणे दाखल गुन्हयातील संशयित इसम हा सोलापूर शहरातील आसरा चौक परिसरातील अन्नपूर्णा स्विटमार्टच्या बाजूला असलेल्या बोळामध्ये थांबला आहे. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी जावून त्याबाबत खात्री केली व संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, ए.टी.एम सेंटर, मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर येथे एका इसमास फसवूण त्याची नजर चुकवून ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून व त्याच्या ए. टी. एमचा पिन नंबर चोरून पाहून त्याचे एका साथीदाराच्या मदतीने सदरचा गुन्हा केले असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवून आणखीन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार बदलून आणखी ०७ ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यावरून खालील प्रमाणे ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१) मंदुप पोलीस ठाणे, गुरनं ५७ / २०२३, भादविक ४२० प्रमाणे.

२) मंगळवेढा पोलीस ठाणे, गुरनं १७५/२०२३, भादविक ४२० प्रमाणे.

३) नातेपुते पोलीस ठाणे, गुरनं २९ / २०२३, भादविसक ४२०, ३४ प्रमाणे.

४) करकंब पोलीस ठाणे, गुरनं ६४ / २०२३, भादविसक ४२०, ४०६ प्रमाणे.

५) इंदापूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, गुरनं ३६ / २०२३, भादविसक ४२०, ३७९ प्रमाणे.

६) वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, गुरनं ४१ / २०२३, भादविसक ४२०, ३४ प्रमाणे.

(७) गंगापूर पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण, गुरनं ३२ / २०२३, भादविसक ४२०, ३४ प्रमाणे.

८) पैठण पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण, गुरनं २२ / २०२३ भादविसक ४२० प्रमाणे.

             अटक आरोपीविरुद्ध यापूर्वी विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा आणखी तपास चालु असून आरोपीताकडून ए.टी.एम अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक केलेबाबतचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

                  सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार सफौ/ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, यश देवकते, समर्थ गाजरे, विनायक घोरफडे, चालक प्रमोद माने यांनी बजावली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत