आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
श्री.गणेश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट – ४, पुणे अनोळखी आरोपी विरुद्ध दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासा दरम्यान पोलीस अंमलदार, विनोद महाजन व नागेशसिंग कुँवर यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, विमाननगर मधिल सिम्बोयसिस कॉलेज जवळ व कल्याणीनगर, येरवडा येथे रात्रीचे वेळी धारधार शस्त्राचा धाक दाखवुन गुन्हे करणारे आरोपी गौरव ऊर्फ सलमान खान, साहिल ऊर्फ मोबासाई शेख व कैफ शेख हे तिघे पार्किंग नं. ०३ संगमवाडी पुणे येथे बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने नमुद ठिकाणी तात्काळ स्टाफ पाठवुन आरोपीतांना कायदेशीर कारवाई कामी ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी तात्काळ जावुन, आरोपी नामे १) साहिल ऊर्फ मोबासाई समीर शेख, वय २१, रा. यशवंतनगर मच्छि मार्केट मागे, शेलार चाळ, येरवडा,पुणे व एक बालअपचारी यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपी व बालअपचारी यांच्याकडे सखोल तपास करुन,त्यांनी त्यांचे साथीदार (फरार) कैफ शेख व विजय ऊर्फडुड राठोड यांच्या मदतीने केलेले १)पोलीस ठाणे विमानतळ गु.र.न. ३२७ / २०२३, भा.द.वि. कलम ३९२, ३४ २) पोलीस ठाणे येरवडा गु.र.न.४४३/ २०२३,भा.द.वि. कलम ३९२, ३४ हे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तसेच आरोपीतांनी गुन्हा करण्याकरीता वापरलेली पालघन व १०,०००/- रु किमतीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन हस्तगत केला आहे.
नमुद आरोपीतांना पुढील कारवाईकरीता पोलीस ठाणे विमानतळ, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पोलीस ठाणे विमानतळ आरोपींतांची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे पुढील तपास करीत आहेत. सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२,श्री.सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक, जयदीप पाटील, महेंद्र पवार सोबत सोबत पोलीस अंमलदार, संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, नागेशसिंग कुर, स्वप्निल कांबळे या युनिट-०४ चे पथकाने केलेली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037