राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी दक्ष पोलीस वार्ता चांदवड
चांदवड ते देवरगाव सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान बससेवा सुरू करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने एस.टी. महामंडळाचे स्थानक प्रमुख डी. आर. वाघमारे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
चांदवड बस आगारातून चांदवड ते देवरगाव मार्गे सायंकाळी सहा ते साडे सहा वाजेदरम्यान नियमित बससेवा सुरू करण्यात यावी. चांदवड ते देवरगाव मार्गातील गावांमधील बहुसंख्य विद्यार्थी चांदवड मध्ये शाळेत व महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थ्यांचे चांदवड मध्येच ट्युशन्स असतात. हे ट्युशन्स, शाळा व महाविद्यालये सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान सुटतात. तेव्हा या विद्यार्थ्यांना घरी जायला देखील बस नसते. यामार्गे तर किती वर्षांपासून सायंकाळच्या सुमाराला बसच नाही. तसेच या गावांमध्ये असंख्य कष्टकरी लोक त्यांची उपजीविका भागवण्यासाठी चांदवडमध्ये मोल – मजुरी करण्यासाठी येतात. सायंकाळी या प्रवाशांना, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना घरी जायला बस नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांना बसची वाट बघत तासनतास् ताटकळ थांबावे लागते. बस नसल्या कारणाने या कष्टकरी लोकांना व विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते किंवा येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना हात द्यावा लागतो. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चांदवड बस आगारातून लवकरात – लवकर देवरगाव, परसुल, भोयेगाव मार्गे सायंकाळी सहा ते साडे सहा वाजता बस सुरू करण्यात यावी तसेच चांदवड तालुक्यातील ज्या – ज्या खेडोपाडी नियमित बस सेवा नसेल अशा सर्व गावांत लवकरात – लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी व नागरिकांच्या, प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतील त्या तत्काळ सोडविण्यात याव्यात. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जनाबाबा केदारे, प्रवीण शिंदे, भूषण निकम, निखिल ढेपले, समाधान आहेर, जगदीश शिंदे, चंद्रकांत भाटेवाल, सिद्धार्थ कापडणी, जीवन जगताप, कृष्णा शिंदे, शुभम गवळी, ओम क्षिरसागर, सागर हिरे, जुबेर पठाण, आदित्य शिंदे, सलमान शहा, ओम सोनवणे, शिवा शिंदे, महेश पवार, शुभम नवले, ओम शिंदे, आरमान पठाण हे कार्यकर्ते उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक , दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037/98228 17037