रवि जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता

नाशिक मधील निफाड तालुक्यातील उंबेरखेड गावामध्ये 25 वर्षीय तरुण ‘भूषण आथरे’ व ‘सागर गोडसे’ यांनी आपल्या शेतात एक अनोखा प्रयोग केला आहे. ‘बायोफ्लॉक फिश फारमिंग’ असे या प्रकल्पाचे नाव असून निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
‘बायोफ्लॉक फिश फारमिंग’ म्हणजे नेमकं काय ?
बायोफ्लॉक ही संकल्पना मुळात इस्राईलची असून या तरुणाने हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करून दाखवला आहे. या तत्रंज्ञाना मध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर न करता मत्स्य पालन केले जाते.
या तरुणांने २०१८ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात केली. ज्यामध्ये फक्त ९ गुंठ्यात त्यांनी ३०००० लिटर क्षमता असलेल्या ५ टाक्या बसवल्या आहेत. ज्यामध्ये ‘तलंगिय’ प्रकारचे मत्स्य बीज टाकले जातात व या एका टाकी मध्ये ४-५ हजार बीज सामावू शकतात. प्रोबायोटीक बॅक्टेरिया व १५ किलो गुळाचे मिश्रण तयार करून प्रत्येक टाकी मध्ये सोडले जातात जे या बीजातून तयार झालेल्या तिलापिया माश्याला खाद्य म्हणून उपयोगास येतात व, खाल्ल्यानंतर माशांनी निर्माण केलेल्या वीश्टेवरच हे बॅक्टेरिया आपली संख्या वाढवतात. म्हणजेच एकदा वापरल्यानंतर हे culture पुन्हा पुन्हा वापरण्याची गरजही भासत नाही आणि खर्चही कमी होतो.
या प्रकल्पामधून या तरुणांनी केवळ सहा महिन्यांत फक्त दिड लाखाची गुंतवणूक करत ६-७ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. त्याचबरोबर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत भूषण आणि सागर यांनी अनेक तरुणांसाठ निफाड बायॉफ्लोक फिश फर्मींग व ट्रेनींग सेंटर या नावाने ट्रेनिंग सेंटर सुद्धा फार अल्प दारात सुरू केले आहे. यामध्ये आतापर्यंत १५०-२०० तरुणांना मार्गदर्शन लाभलेले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून हा बायोफ्लोक फिश फर्मिंग प्रकल्प नक्कीच फायदेशीर ठरू शकतो हे या तरुणांने पटवून दिलेले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालया मार्फत राबवल्या गेलेल्या ग्रामीण कृषी, जागरूकता कार्यानुभव व कृषिकन्या मधे प्रीती जावळे, प्रियांका जेधे, साक्षी जगताप, अदिती दारकुंडे, पूजा गोसावी, संस्कृती कडाळे, निकिता गवळी यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. या कार्यात त्यांना के.के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. हाडोळे, प्रा. पी. बी. पवार, प्रा. व्ही. पी. गुळवणे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ReplyForward
|