अन्य

चारधाम यात्रेचे पैसे घेऊन फसवणूक पुणे धायरीतील ट्रॅव्हल्स कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता

                    याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २६ फेब्रुवारी रोजी धायरी येथील ड्रिमकास्टर टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स या ट्रॅव्हल्सचे चालक ऋषिकेश भडाळे यांनी तक्रारदार यांच्याकडून चारधाम यात्रेसाठी बुकींग म्हणून एकवीस हजार रुपये घेतले.

               नंतर काही दिवसानी भडाळे यानी तक्रारदार यांना qr कोड मैसेज करुन त्यांचा कडून यात्रे चे उर्वरित खर्च पैकेज अनुसार शिलक राहिलेले पस्तीस हजार रुपये ही पाठवण्यास सांगितले असे एकूण छप्पन हजार रुपये घेऊनही चारधाम यात्रा न पुरविता तक्रारदार यांचा विश्वासघात करून फसवणूक केल्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव करीत असता अजुन एक मोठी बाब त्यांना या तपासा दरम्यान अढळून आली की धायरीतील या ट्रॅव्हल्स कंपनीने १४५ जणांना गंडा घातल्याचे समोर येत असून जवळपास ४० लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. यातील मुख्य आरोपी संकेत भडाळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत