अन्य

लातूर शहर येथे विवेकानंद पोलिस ठाण्याची कामगिरी चोरी गेलेला 1 लाख 99 हजार चा मुद्दे माल जप्त

Spread the love

आनंद बन्सल/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,पुणे

                  स्वामी विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडीतील सराईत आरोपींकडून चोरीस गेलेल्या इलेक्ट्रिकल साहित्यासह १ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. औसा सध्या राहणार गरूड चौक, लातूर याला दि 30 जून रोजी ताव्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या आणखीन एक साथीदाराच्या मदतीने इलेक्ट्रिकल साहित्याची दुकानामध्ये चोरी करून इलेक्ट्रिकल साहित्य चोरल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल इलेक्ट्रिकल साहित्य एकूण 1 लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे लपवून ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. दि 22 जून ते 23 जूनच्या मध्यरात्री स्वामी विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरूड चौक परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानाचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गोडाऊनमधील 1 लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल साहित्य चोरून नेले.

               तक्रारीवरून स्वामी विवेकानंद चौक पोलिस अधीक्षक सोमण मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाणे विवेकानंद चौकचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावरून आरोपी प्रशांत अशोक गाडेकर वय 33 रा. भादा,सध्या राहणार राहणार गरूड चौक, लातूर याला दि. 30 जून रोजी ताव्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या आणखीन एक साथीदाराच्या मदतीने इलेक्ट्रिकल साहित्याची दुकानामध्ये चोरी करून इलेक्ट्रिकल साहित्य चोरल्याची कबुली दिली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत