अन्य

परंडा येथे गर्भपात व उत्तेजक गोळ्यांची अवैध खरीदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,पुणे 

               परंडा पोलिस व अन्नभेसळ विभागाची संयुक्त कारवाई या घटनेत पोलीसांनी लाखो रुपयांच्या गोळ्या जप्त करुन २ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.एकास अटक, एक फरार तर बार्शी येथील आकाश ढोबळे यास अटक करण्यात आली आहे.सदरील आरोपी हे उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात गर्भपात व उत्तेजक गोळ्या औषधाची अवैध विक्री करत असल्याचे समजते. याबाबत पोलीसा कडुन मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गर्भपाताच्या गोळ्याचे एमटीपी किट अवैध विक्री करण्यासाठी बार्शी येथील काही लोक येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी अन्न व औषध विभागाचे निरिक्षक श्रीकांत पाटील यांच्यासह परंडा बस स्थानक रस्त्यावर रमाई चौकात सापळा लावला होता. यावेळी आरोपी कारमध्ये औषधसाठा घेऊन विक्री करण्यासाठी केल्या आहेत. संध्याकाळच्या सुमारास रमाई चौकात येताच पोलिस पथकाने छापा मारून कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये अवैध औषधीसाठा दिसुन आला. आरोपीकडे या औषधी खरेदीच्या पावत्या नसल्याचे उघड झाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन कारमधील गर्भपात करणारे एमटीपी किट व उत्तेजक गोली चे लाखो रुपये किमतीच्या सामान पोलिसांनी जप्त केला.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत