जुल्फीकार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
नाशिक तालुक्यातील महिरावनी हे गाव नाशिक त्रिबंकेश्वर रोड वर वसलेले असुन या गावात शेतकरी कामगार वर्ग जास्त प्रमाणात असुन संदिप युनिव्हरसिटी कॉलेज, होटेल व्यवसाय भरपूर प्रमाणात असल्याने कॉलेज सुटल्यावर गेट समोर मुलांची भरपूर गर्दी होते.कॉलेजच्या गेट समोरच बस स्टॉप असल्याने रस्त्यावर वाहने उभी राहिल्याने ट्राफिक जाम मुळे छोट्या मोठ्या अपघाता सारख्या घटना घडत असतात. गावात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरील मनमौजी तसेच शेजारील गावातील टवाळखोरांची रेलचेल जास्त प्रमाणात असते,टवाळखोर नशे करू शालेय विद्यार्थी विद्यार्थींनीची छेडाछाडीचे प्रकारातून त्याचे रुपांतर हाणामारीत होतात. टवाळखोर जवळील गावतील असतात आणि ते फोन करुन लाठ्या काठ्या घेवून काही महाभाग तर चक्क चाकू चोपर घेवुन येतात त्यामुळे खुना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात आणि या मागील काळात अनेक वेळा घडले या मुळे महिरावनी ग्रामस्तां कडुन महिरावनी येथे भौगोलिक दृष्ट्या विचार करता पोलीस चौकीची मागणी होताना दिसत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037