सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता मोखाडा
जव्हार प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या जव्हार मोखाडा तालुक्यात 2021-22 या आर्थिक वर्षात प्रकल्प कार्यालय जव्हार मधून बायफ या संस्थेला वाडी प्रकल्प राबविण्यासाठी दिला होता.या मधे प्रती लाभार्थी 100 काजूची झाडे दिली होती. त्याच्या मोबदल्यात 3 वर्षात 120000 रुपये खड्डे खोदणे,कुंपण करणे, खत यासाठी देणार होते परंतु 2 वर्षाचा कालावधी मधे 11,400 रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत या मधे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याची चर्चा शेतकरी करत आहेत .या घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी आज दिनांक .22/06/2023 रोजी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका वतीने जव्हार प्रकल्प अधिकारी आयूषी सिंह मॅडम यांना निवेदन देऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा,उपाध्यक्ष अनंता धनगरे,अदनान रावथर ,रवी सुतक उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037