हरीष शिंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
20/6/23 रोजी सौ.भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कुल ब्राम्हणगाव येथील विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम जिजाऊ संघटनेच्या वतीने पार पाडला सदर कार्यक्रमास जिजाऊ परिवारातील सदस्य व ग्रामपंचायत आसे येथील सरपंच श्री.आनंता बाळु मौळे याच्या हस्ते वह्या व पुस्तकांचे वितरण करण्यात आले . त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना खेळण्याचे साहित्य सुद्धा जिजाऊ संघटनेने उपलब्ध करून दिले. शाळेचे इनचार्ज व सहकारी शिक्षक तसेच कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व पालक यांनी जिजाउचे खुप आभार मानून जिजाऊ संघटनेचे संस्थापक माननीय श्री . निलेशजी सांबरे साहेबांना धन्यवाद दिले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037