या संकल्पनेतून सातपूरला महोत्सव समितीच्या वतीने साकारणार तथागत महानाट्य महाकारुणी,तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची शिकवण, आपणा सर्वांना नेहमीच एक ऊर्जा व शांततेचा संदेश देणारी ठरलेली आहे, आपल्या जीवनाचा निती संकल्प कसा असावा सांगणारे, दुःख मुक्तीचा मार्ग प्रस्थापित करणारे केवळ मानवी कल्याणाचा महामंत्र देणारे, विज्ञानवादी बौद्ध धम्माचे संस्थापक बोधिसत्व तथागताने आपणास मानवी शृंखला जोडणारा धम्म दिला आहे, आणि संपूर्ण जगावरती तथागताचे. धम्मचक्र आजही प्रवर्तित तेजोमय होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर सातपूर ” ऐक शहर भीम महोत्सव समिती” च्या वतीने तथागताच्या जीवनपटाशी संबंधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या महाग्रंथावर आधारित शाक्यमुनी, महाकारूणी “तथागत गौतम बुद्ध” यांच्या जीवनपटावर लक्ष वेधणारे प्रख्यात फिल्म दिग्दर्शक व थिएटरकार डॉ. शैलेंद्र कृष्णा बागडे प्रस्तुत राष्ट्रीय स्तरावरील २५१ कलाकारांसह, प्रख्यात पार्श्व गायक कविता क्रुष्णमुर्ती व उदित नारायण याचे सुमधुर आवाज आहेत,तर प्रख्यात. अभिनेते ओम पुरी व विक्रम गोखले यांचे संवाद आहेत,असा भव्य संच असलेले दिव्य रोषणाई युक्त देशातील सर्वोत्कृष्ट साऊंड क्वालिटी असलेले एकमेव नेत्र दीपक “महानाट्य तथागत” सातपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी समितीचे वतीने आयोजित करण्यात आलेले आहे, मागील वर्षी याच ठिकाणी डा. भिमराव आंबेडकर महानाट्य सादर केले असता येथे हजारोंचा जनसागर उसळला होता,तेव्हा संपुर्ण आंबेडकर संकुल तुडुंब भरलेले होते,यावर्षी २५००० पर्यंत जनसमुदाय येण्याची शक्यता वर्तविण्यात समितीच्या वतीने वर्तविण्यात आली आहे..तरी सर्व नागरिकांनी या महानाट्यास सह कुटुंब व मित्र परिवारासह उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे स्थळ रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, एस आय सी रुग्णालयामागे सातपूर नाशिक येथे होणार आहे. निमंत्रक: भीम महोत्सव समिती सातपूर शहर २०२३ अध्यक्ष,हर्षल काळे,कार्याध्यक्ष,सत्यवान चक्रे, उपाध्यक्ष,प्रशांत जगताप, खजिनदार सत्यवान चक्रे,कोअर कमिटीचे मुख्य समिती रवींद्र बाबुराव काळे,रवींद्र धिवरे,रवींद्र छबूजी काळे, नंदकुमार जाधव, अरुण काळे, शिवाजी काळे,योगेश गांगुर्डे, बजरंग शिंदे, नितीन(बाळा)निगळ,अशोक उशिरे, अनिल काळे, संतोष काळे,शशिराज काळे,आदेश पगारे, विनोद आवारे, सुरेश उबाळे,मायाताई काळे, तथागत महानाट्य आवर्जुन बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
– नंदकुमार जाधव.निमंत्रक
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037