अन्य

सीईटीच्या परीक्षेसाठी नवीन ‘मॉक टेस्ट’ ॲपची एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून निर्मिती

Spread the love

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , चांदवड

              नवीन ‘मॉक टेस्ट’ ॲपची एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून निर्मिती प्रसंगी ॲपचे अनावरण विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा व प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती, डॉ. वाय. एल. भिरुड, डॉ. सौ. के. एम. संघवी , डॉ. आर. आर. भंडारी आदी .

         बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आपण जर एमएचटी -सीईटीचा अभ्यास करत असाल तर प्रत्यक्ष परीक्षेच्या तयारीसाठी विनासायास कसरत व ताण घेण्याची भिती आता दूर करा कारण चांदवड येथील नॅक मानांकित ‘ अ ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक अनोखे मॉक टेस्ट ॲप विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध केले आहे. ज्याद्वारे विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या तयारीची पडताळणी करू शकतात.

                राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, आणि कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश एमएचटी – सीईटी या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून निश्चित करण्यात येतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. बारावीच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेतात. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षेची तयारी व्हावी आणि त्यासंबंधीची भीती जावी म्हणून एसएनजेबीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने हे ॲप विकसित केले आहे.

            याबद्दल अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड यांनी सांगितले की, बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एमएचटी -सीईटीच्या तयारीसाठी हे ‘मॉक टेस्ट ॲप ‘ विकसित केले असुन हे ॲप वापरण्यास अत्यंत सहज व सुलभ आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध केले असून, सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ॲपच्या निर्मितीत निलेश खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

•ॲपची वैशिष्ट्ये–

· एका विद्यार्थ्याला 30 मॉक टेस्ट देता येतील.

· गुगल प्ले स्टोअरवर SNJB MOCK MHT-CET या नावाने उपलब्ध.

· भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांच्या प्रत्येकी दहा प्रश्नपत्रिका.

· विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुण आणि त्यांची सविस्तर उत्तरे पाहता येणार.

मॉक टेस्ट चे फायदे–

· विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षेची तयारी होते.

· परीक्षेसंबंधीची भीती जाते.

· अभ्यासाच्या उजळणी बरोबरच परीक्षेच्या तयारीची पडताळणी होते.

· अभ्यासाची कच्चे दुवे लक्षात येतात.

· अधिक चांगल्या सरावाची संधी उपलब्ध होते.

                    सदर ॲपचे अनावरण विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा व प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती, डॉ. वाय. एल. भिरुड, डॉ. सौ. के. एम. संघवी , डॉ. आर. आर. भंडारी आदी उपस्थित होते. सदर ॲपच्या निर्मितीबद्दल संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी शुभेच्छा दिल्या.

साजिद शेख

साजिद शेख – मुख्य संपादक 

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत