अन्य

दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था ; खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

              दिंडोरी तालुक्यात रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाली असून दर्जेदार रस्ते होण्याची मागणी जनतेकडून होत आहे. याच तालुक्यात विविध ठिकाणी अतिशय संथ गतीने व निष्कृष्ट दर्जाचे कामे होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रचिती पाडे-निगडोळ -पिंपळगाव धुम फाटा सुरु असलेल्या रस्त्याकडे बघितल्यावर दिसून येते.

                 पाडे-निगडोळ -नळवाडपाडा- पिंपळगाव धुम फाटा या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असून अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे. असे असताना देखील संबंधित अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेतात हे विशेष. पाडे – निगडोळ सात किमी तर निगडोळ – पिंपळगाव धुम फाटा सात किमी असे १४ किमी रस्त्याचे काम आहे. सदर झालेल्या रस्त्याचे काम दोन दिवसातच खडी उखडून गेली आहे. खडी टाकताना डांबरचा वापर न केल्याने खडी उखडून चालली आहे. या खडीमुळे वाहने पलटी होत आहे. दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल या रस्त्यावरून नाशिक, पेठ, पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये घेऊन जावा लागतो.

               त्यामुळे चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस भरलेला ट्रक या रस्त्यावर पलटी झाल्याने शेतकऱ्यां‍चे व वाहनाचे नुकसान झाले आहे. असे प्रकार नित्याचेच झाले आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल रस्त्यावर टाकण्याची वेळ येत असल्याने शेतकऱ्यांसह वाहनधारक संतप्त झाले आहे.

                  संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर या कामाला गती मिळवून दर्जात्मक काम करावे अशी मागणी होत आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत