रमीम काद्री / विभागीय संपादक – दक्ष पोलिस वार्ता , येवला.
येवला तालुक्यातील युवा कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज जमधडे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाल्याची दु:खद बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या अकाली निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे हे नक्कीच.
ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच येवला तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प अनिल महाराज जमधडे यांचे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच आध्यात्मिक क्षेत्राची आवड निर्माण करत चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू होते. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील त्यांच्याकडून राबविण्यात येत होते. नुकताच त्यांनी शहीद जवानांच्या स्मृतिसाठी हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. आज अचानक त्यांच्या निधनांचे वृत्त मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे.
दक्ष पोलीस वार्ता ची टीम व प्रेक्षक जमधडे परिवार व ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037