अन्य

नासिक जव्हार मोखाडा खोडाला चौफुली बिरसा मुंडा चौकात सार्वजनिक स्वच्छता गृहाची मागणी

Spread the love

मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा 

                  मोखाडा शहराच्या सुरवातीलाच मोखाडा जव्हार खोडाला चौक येथून शहरात प्रवेश करताना बिरसा मुंडा चौकात चौफुलीवर नाशिक जव्हार मोखाडा खोडाळा कडुन ये जा करणारे रोज हजारो प्रवासी ये जा करतात परंतु येथे सार्वजनिक स्वच्छताग्रह व शौचालय नसल्याने महिला व वय वृध्दांना अनेक वेळा उघड्यावर जावे लागते, याकडे लक्ष वेधून मोखाडा नगरपंचायत चे नगरसेवक भगवान निकम यांना विचारले असता नगरपंचायत कडे अनेक वेळा मागणी करुनही जागेची अडचण पुढे करत असल्याचे नगरपंचायत प्रशासन चे म्हणे आहे

                    मात्र या आगोदर मिनी बस स्थानक होते तिथे जर नगरपंचायतने बांधकाम केले तर बाहेरुन ये जा करणाऱ्या प्रवासी महिला व वृध्दांना अनेक वेळा होणारा त्रास होणार नाही व गैरसोय दुर होईल,तरी नगरपंचायत प्रशासन याकडे त्वरित लक्ष देवून सार्वजनिक स्वच्छता गृह व शुलभ शौचालय उभारावे अशी मागणी नगरसेवक श्री भगवान निकम यांनी नगरपंचायत प्रशासनाला केली आहे.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत