अनिस शेख / उपसंपादक ,दक्ष पोलीस वार्ता, बार्शी
बार्शी आगाराच्या डेपोच्या बसला तुळजापूर रस्त्यावर शेळगावच्या पुढे अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्वच प्रवासी सुखरूप आहेत. पण, काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. तुळजापूरहून बार्शीला येणाऱ्या या बसमधून ६० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. खराब रस्त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याने पुन्हा एकदा बार्शी-तुळजापूर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर, प्रवाशी वर्गांतून संताप व्यक्त होत आहे.
बार्शीकडे येत असलेली ही बस शेलगावच्या पुढे असलेल्या पीराजवळ रस्त्यावरुन थेट शेतात गेली. त्यानंतर, मोठ्या खड्ड्यात बस रुतून बसली होती.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037