सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
नाशिकच्या पेठ तालुक्यातील पळशी-चिखली मार्गावरील रस्त्यावर चिखली गावानजीक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझरचा अपघात झाला आहे.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चिखली गावानजीक अपघात
पेठकडून चिखलीकडे प्रवासी वाहतूक करणारी क्रुझर चिखली गावानजीक एका उतारावर उलटल्याने हा अपघात झाला. यात रामदास गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर
या अपघातातील चार गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून, काही जखमींवर पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे.
पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या अपघात प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाडर, दिलीप रहेर, आहेर, ससाणे आदी अधिक तपास करीत आहेत.
अपघातातील जखमींची नावे
लक्ष्मण रामजी ठोंबरे
वसंत तुकाराम चौधरी
रेखा गणपत करवंदे
मोहन रामा जांजर
वामन महादु गायकवाड
मोतीराम नवसु भोये
मुरलीधर नारायण दोडके
शिवराम रतन दरोडे
लक्ष्मण काशिनाथ पाडवी
लक्ष्मीबाई येवाजी पवार
जिजाबाई महादू गाडर
कुसुम गणपत बाम्हणे
साळुबाई किसन
मनी किसन मानभाव
पवना गणपत बाम्हणे
अंजनी तुळशीराम भुसारे
कमळीबाई हरी ढेपणे
जयराम काशीराम गाडर
पुंडलिक कृष्णा गाडर
देवाजी त्रंबक भवर
हरी काशीराम ठेवणे
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037