सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक
नाशिक शहराची स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेल्या वॉटरग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांनी परिसरात आंदोलन केले. तसेच कंपनीला ठेका देण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप देखील या वेळी करण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये वॉटर ग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ठेकेदारी माध्यमातून ७०० कामगार आहेत, तीन वर्षासाठी ठेका देण्यात आला आहे. शहरातील साफसफाईचा आणि त्या दृष्टिकोनातून ठेकेदारांकडून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून पिळवणूक होते. त्यांचा पगार जो काही महानगरपालिका प्रशासन देते. त्याआधीच ठेकेदारांकडून निम्मा पगार काढून घेत जात असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून दिवाळीचा जो बोनस असतो. एक पगार महानगरपालिका प्रशासन ते ठेकेदार या मुलांच्या अकाउंटला जमा करत होती. यांच्या खात्यातून तो बोनसही काढून घेतला जायचा. गेली दोन वर्ष यांना दिवाळीचा बोनसच मिळालेला नाही, अशी माहिती मनसेचे दिलीप दातीर यांनी दिली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037