नकली नोटांची अदलाबदल करणाऱ्या टोळीला वाडा पोलिसांकडून अटकप्रतिनिधी अतिक कोतवाल जव्हार दि २२/२/२०२५ रोजी वाडा पोलीस ठाण्याचे पोलिसांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की पाली गावाच्या हद्दीत काही इसम भारतीय चलनातील खऱ्या नोटा व खऱ्यानोटा प्रमाणेच दिसणाऱ्या नकली नोटा एकत्रित करून त्या चलनात आणण्यासाठी व आदलाबदल करण्यासाठी एकत्र येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने पाली नाका येथे जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेट जवळ एक इसम अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील लाल रंगाचा टी-शर्ट व चॉकलेटी रंगाची जीन पॅन्ट घातलेली हातात काळ्या रंगाची लगेच बॅग घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसला त्याच्यावर पालत ठेवून पोलीस पथक दबा धरून बसलेले असताना दुपारी पावणेचार च्या सुमारास विक्रमगड कडून आलेली सिल्वर रंगाची ईर्टिगा कार क्र M H ०४ J M ३१३५ ही जिल्हा परिषद शाळा पालीच्या गेट जवळ येऊन थांबली त्या कारमधून दोन इसम खाली उतरले व हातात काळ्या रंगाची लगेच बॅग घेऊन तिन्ही इसमे एकमेकांशी चर्चा करत असताना पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार व पथकानी सदर इस्मानवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १०० रुपये दराच्या नोटांचे ४ बंडल एका बंडल मध्ये १७ बंडल असे तर ५०० रुपये दराच्या नोटांचे १ बंडल त्या बंडल मध्ये ५०० रुपये नोटांचे १६ बंडल असे प्लास्टिकच्या पारदर्शक आवरणे व रबर बँड च्या साह्याने पॅक केलेल्या मिळून आल्या तसेच नोटांचे आकाराचे काला रंगाचे पुठ्ठ्याचे दोन बंडल पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशव्या मध्ये दोन बंडल व नोटांचे बंडल तयार करण्यासाठी वापरत असलेले पारदर्शक चिकट पट्ट्या अशा मिळून आला तर इर्टिका गाडीतून आलेले दोन इस्मंसाकडे ५०० रुपये नोटांचे दोन बंडल भारतीय चलनातील खऱ्या नोटा असे एक लाख रुपये मिळाले लाल टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेल्या समोरच्या ताब्यात असलेल्या नोटांमध्ये ५०० रुपये १०० रुपयाचे दराचे नोटांच्या बंडल मधील वर असलेल्या शेवटी असलेल्या नोटांच्या या खऱ्या खोट्या नोटा असून त्याखाली असलेल्या नोटा या भारतीय बच्चो का बँक असे लिहिल्या भारतीय चलनातील खऱ्या नोटा प्रमाणे दिसणाऱ्या नकली नोटा अशा १४ लाख रुपये किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या ताब्यात घेतलेल्या ईस्मान कडे विचारपूस केली असता सदर नोटा या आदलाबदल करण्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले ताब्यात घेतलेल्या इसमाची नावे (१) विकास उर्फ विकी प्रकाश पवार वय ३२ राहणार शिरीष पाडा ता वाडा जि पालघर (२) इम्तियाज बशीर शेख वय ५६ राहणार कासा बुद्रुक विक्रमगड जिल्हा पालघर (३) वसीम अन्वर सय्यद वय ३६ वर्ष राहणार कऱ्हे तलावली ता विक्रमगड जि पालघर अशी असून याबाबत वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा र क्र ८३ / २०२५ भारतीय न्याय सं क ३१८/ 4 १८०/ १८२ /३ /५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उ नि श्री सागर मालकर नेमणूक वाडा पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई श्री बाळासाहेब पाटील पो अधी पालघर श्री विनायक नारले अ पो अ पालघर श्री गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्तात्रय केंद्रे पोलीस निरीक्षण वाडा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर मालकर पोलीस निरीक्षक श्री मयूर अंबाजी पोलीस निरीक्षक श्री मयूर शेवाले पो ह श्री गुरुनाथ गोतरणे पो ह श्री विजय मडवी पो ना श्री मनोज चौधरी पो नि श्री गजानन जाधव पो नि श्री भूषण खिल्लारे पोश्री संतोष चौधरी सर्व नेमणूक वाडा पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे