भारती विद्यापीठ जव्हार शाळेत पत्रकारांचा गौरव प्रतिनिधी अतिक कोतवाल जव्हार जव्हार: भारती विद्यापीठ संकल्पनेचे मूळ पुरुष , माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत जव्हार येथील भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता शाळेच्या प्रांगणात जव्हार व विक्रमगड तालुक्यातील पत्रकारांना निमंत्रित करत शाळेचे मुख्याध्यापक डॉ.अर्जुनकुमार राठोड यांनी एक अनोखा कार्यक्रम घेत सन्मान केला. कार्यक्रमाची औपचारिकता पार पडल्यानंतर ,मुख्याध्यापक डॉ. राठोड यांनी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी पत्रकारितेमध्ये केलेल्या कामांची उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ओळख पर जाणीव करून दिली. तद्नंतर जव्हार तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत आपले सुप्त गुण ओळखत त्या दृष्टीने अभ्यास करावा आणि प्रत्येक क्षेत्रात आपण बेस्ट राहू असे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर अतिक कोतवाल यांनी आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण या वृत्तपत्राबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. व शब्द संग्रह वाढविण्यासाठी वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे पालघर जिल्हा अध्यक्ष चित्रांगण घोलप, दीपक भिसे, इम्रान कोतवाल आधी जव्हार तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते, शिवाय विक्रमगड तालुक्यातून संजय नेवे, ओंकार पोटे, राहुल वाडेकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. पत्रकारांना देण्यात आलेल्या सन्मानाचा विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पत्रकारांनी शाळेचे मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.शिवाय शाळेच्या वतीने सूत्रसंचालन फिरदोस लुलानिया मॅडम यांनी केले कलाशिक्षक (सहाय्यक शिक्षक ) अविनाश मधुकर मुकणे ,वरिष्ठ सहाय्यक शिक्षिका लता नायकर ,सहाय्यक शिक्षिका दिपाली ठाकरे सहाय्यक शिक्षिका- वैशाली जाधव , ललित गाडगे आदी उपस्थित होते.