प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा ) विक्री करणारा आरोपी जेरबंद ०६,२९,०१२/- रू. किं. मुददेमाल जप्त
*नाशिक प्रतिनिधी : माजिद खान*
दिनांक १६/११/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या व.पो.नि. सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक येथे इसम नामे इम्तीयाज जाफर तांबोळी, वय- ३८ वर्षे, रा- प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एम. एच. ०५ बी. एल. २०४० हिच्या मध्ये व त्याचे रहाते घराचे पार्किंगमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुंगधित पान मसाला याची विक्री करत असल्याचे माहिती मिळाल्याने, सदर आरोपी यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वत:चे कौशल्य वापरून शिताफिने पकडुन त्याचे ताब्यात ०२,२९,०१२ /- रूपये किंमतीचा प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुंगधित पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने सदरचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु असा व वाहन असे एकुण ०६,२९,०१२/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरूद्ध भा.न्या.सं.२०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३ (५) सह अन्न व सुरक्षा अधिनियम कलम २६ (२) (iv) कलम २७ (३) (९) सहवाचन कलम ३(१)(zz)(iv) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, मा. श्री. प्रशांत बच्छाव, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि. सुशिला कोल्हे, स.पो.नि. सचिन चौधरी, स.पो.नि. विशाल पाटील, स.पो.उ.नि. रंजन बेंडाळे, स.पो.उ.नि. देवकिसन गायकर, स.पो.उ.नि. संजय ताजणे, पो. हवा. १७४९ भारत डंबाळे, पो. हवा. १७३१ बळवंत कोल्हे, पो. अं. ८६९ अनिरुध्द येवले, पो. अं.२३३० अविनाश फुलपगारे, पो. अं/ २४२५ योगेश सानप, पो. अं. २४३२ बाळासाहेब नांद्रे, पो. अं. २४३३ चंद्रकांत बागडे, म. पो. शि. २३६६ अर्चना भड यांनी कामगिरी केलेली आहे.