आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
मोहोळ ग्रामीण भागामध्ये साधारपणे फेब्रुवारी महीन्यापासुन वाळुज, अनगर, पेपुर, शेटफळ, या ग्रामीण भागत अशा ठिकाणी अचानकपणे घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. सदर घरफोडी थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वेळो वेळी मोहोळ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्हे उघडकीस आणने करीता सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या प्रमाणे मोहोळ पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यामध्ये रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तपास करणे, बार्शी, कामती मंगळवेढा मोहोळ अकलुज, सोलापुर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांचा कार्य पध्दतीचा अभ्यास केला होता मात्र काहीएक सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे लक्ष दिले असता तांत्रीक बाबीचे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळणारी माहीती यांचे आधारे खालील चार चार संशयीत इसमांची संशयीत व्यक्तीचा गुप्तपणे अभ्यास चालु ठेवला असता अलीकडील काळात ते कोठे येत जात होते, तसेच त्यांनी काय खरेदी विक्री केली, त्यांच्या रोजच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहीती काढुन त्यातुन सदरच्या घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर संशयीत इसमांना ताब्यात घेवुन कसोशीने चौकशी करून व त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी खालील गुन्हयाची कबुली दिली आहे. खालील घरफोडी मधील एकूण ०२ लाख १५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीकडे अजुन तपास चालू असुन आणखी काही गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मोहोळ विभाग, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विणोद घुगे मोहोळ पोलीस ठाणे, सपोनि हेगडकर पोसई/खारगे, पोहेकॉ /सचिन माने, पोना / अमोल घोळवे, पोना/प्रविन साठे, पोकॉ/ सिध्दनाथ मोरे, पोकॉ/ अजित मिसाळ, पोकॉ/ संदिप सावंत, पोकॉ/ स्वप्नील कुबेर सायबर पोलीस ठाणेकडील धिरज काकडे यांनी गुन्हयातील आरोपी पकडुन कैशल्यपूर्ण तपास करून गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यास व तपासकामी मदत केली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037