आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
१० लाख ५०,०००/- रु.चा मुद्देमाल केला हस्तगत उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक २१/०७/२०२३ रोजी एमईएस गेट उत्तमनगर पुणे येथे मार्शल अमंलदार पोलीस अंमलदार सचिन गायकवाड हे गस्त करत असताना त्यांना महिंद्रा पिकअप गाडीचा संशय आल्याने त्यांनी ती गाडी चेक केली असता. पोलीसांना पाहुन गाडीतील ०५ सशयित गाडी सोडुन पळुन गेले. पोलीस अंमलदार गायकवाड यांना त्या गाडीत कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याचे पाणी आडविण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी प्लेट मिळुन आल्या. गाडीमालक सुरेंद्र चंद्रीका यादव वय २५ वर्ष रा. कोंढवे धावडे, पुणे मुळगाव-सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता, तपासात सुरेंद्र यादव व त्याचे इतर ०६ साथीदारांनी बहुली. गावाजवळील कोल्हापुरी पध्दीतीच्या बंधा-यावरुन लोखंडी प्लेट चोरल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी खडकवासला पाटबंधारे विभागाशी संपर्क करुन खात्री केली असता मुठा नदीच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यावर एकुण १२० लोखंडी बर्गेपैकी १०८ लोखंडी बर्गे (प्लेट) चोरीस गेलेले आहेत. त्याबाबत पाटबंधारे विभागाने पोलीसात तक्रार दिल्यानंतर त्याबाबत गुन्हा दाखल करुन आरोपी १. सुरेंद्र चंद्रीका यादव वय २५ वर्ष रा. कोंढवे धावडे, पुणे जि.सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश २. रामरक्षा धरमराज पासवान वय ३८ वर्षे रा. विदयावेली शाळेजवळ, सुसपाषाण रोड, सुसगाव, पुणे ३. मुनीराम संतराम यादव वय ४० वर्षे जि सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश ४ . राहुल अमिरका यादव वय १९ वर्षे जि-सिध्दार्थनगर ५. प्रिन्स ऊर्फ मिथोलेस हरिचंद्र यादव वय १८ वर्षे जि- सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश ६. प्रदीप आंबिका कनोजिया वय १८ वर्षे जि-सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश यांना अटक केली असुन चोरीस गेलेल लोखंडी प्लेट व चोरीकरता वापरलेली वाहने जप्त केली आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील,मा.पोलीस उप- आयुक्त, परी ०३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग श्री. भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तममगर पोलिस स्टेशन श्री. किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शबनम शेख यांच्या सूचनाप्रमाणे तपासी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, सहा. पोलीस निरीक्षक दादाराजे पवार पो.अमंलदार तानाजी नांगरे गणेश हजारे, सचिन गायकवाड, तुषार किंद्रे, ज्ञानेश्वर तोडकर, समीर पवार, परमेश्वर पाडाळे यांनी केली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037