आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
अंलकार पोलीस ठाणे, पुणे शहर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते फिर्यादी यांना पुनः प्रदान दि.२७/११/२०२२ रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांचे घरातील रक्कम ९८,१५,०००/- रुपये किंचे डायमंड व सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करून चोरी केलेबाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं.१३६/ २०२२,भादवि कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास चालु केला असता,अलंकार पो.स्टे. तपास पथकातील पोलीस अंमलदार, धीरज पवार, सागर केकाण व नितीन राऊत यांना एक पुरूष व एक महिला संशईतरित्या घटनास्थळाच्या आजूबाजूला फिरताना आढळून आले. त्याआधारे आणखीन तपासणी केली असता,एका दुचाकीवरून एक पुरूष व एक महिला त्या ठिकाणी आली असल्याचे दिसून आले. त्यावरून तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी संशईत इसम राजु दुर्योधन काळमेघ, वय ४५ वर्षे, रा. एन. बी. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, पुणे ( अटक) यास ताब्यात घेवुन, त्याच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याची महिला साथीदार सोनिया पाटील असे दोघांनी मिळून केला असल्याचे कबुल केल्याने, राजु काळमेघ यास दिनांक ०६/११/२०२२ रोजी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
तांत्रिक विश्लेषणाचे आधारे महिला आरोपीचा शोध घेणेकामी वेग-वेगळ्या ठिकाणी तपास पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्रीमती. संगिता पाटील यांचे पथकाने आरोपी महिला सोनिया पाटील ही दाखल गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल घेवून पळून जाण्याचे तयारीत असताना,वाकड या ठिकाणावरून सोनिया श्रीराम पाटील, वय-३२ वर्षे, रा. सदर ( अटक) हिस मुद्देमालासह दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल अटक आरोपी इसम व महिला यांचेकडून हस्तगत करण्यात आल्यानंतर तो जप्ती पंचनाम्याने जप्त करून, मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आला होता. सदरचा मुद्देमाल दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना परत करणेबाबत मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आज दिनांक १३/०७/२०२३ रोजी मा. पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांचे हस्ते ७९,८४,४८०/- किंचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे.
सदरवेळी मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.राजेश तटकरे व पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्रीमती. संगिता पाटील हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्रीमती संगिता पाटील यांचा मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037