सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर
आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने शासकीय आश्रमशाळा शिरोळ व गीता माध्यमिक विद्यालय विहिगाव येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितले की सामाजिक कार्या साठी मोखाडा तालुक्यातील नव्हे तर शहापूर तालुक्यातील विद्यार्थी हे देखील आमचे बांधव च आहेत, आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.तसेच त्यांनी सांगितले की आश्रमशाळा मध्ये विद्यार्थी संख्या वाढत असल्याने अधिक व्यवस्था करणे गरजेचे आहे शिक्षक संख्या,इमारती देखील सुसज्ज असल्या पाहिजेत या साठी शासना कडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला श्री मंगेश दाते, संजय वाघ, गणेश वाघ पत्रकार, नंदकुमार वाघ, संतोष पाटील,भारत बुधर, नरेंद्र येले, परशुराम अगिवले, निलेश ठोमरे,अंनता वारे अजय कथोरे,सौ.योगीता झारगडे, योगेश झारखंडचे, नामदेव सप्रे, विठ्ठल गोडे,चुनिलाल पवार, अशोक वाघ, रमेश बोटे, आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती सदस्य व अजनुप ग्रामपंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मंगेश दाते कार्याध्यक्ष यांनी केले ,शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२१७०३७