अन्य

कालिका माता मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

Spread the love

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

अवघाची संसार सुखाचा करिन | आनंदे भरीन तिन्ही लोक||

जाई न घे माये तया पंढरपूरा | भेटेन माहेरा अपुलिया||

           नाशिक जिल्ह्यातील गंगापूर गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री कालिका माता देवता, श्री गणेश व वारकऱ्यांचे उपास्य श्री विठ्ठल भगवान व रुख्मिणी माता यांचा जीर्णोद्धार होऊन नवीन वास्तूत विराजमान झालेले आहे. त्यानिमित्ताने अखंड हरीनाम सप्ताहाचे दि.२५/०४/२०२३ ते दि.०२/०५/२०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. सदरचा सप्ताह हा नाशिकचे वैभव मा. श्री.दशरथ (आप्पा) पाटील, माजी महापौर, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच ह.भ.प.संतदास रामनाथ महाराज धोंडगे यांच्या मार्गदर्शनाने हा नामयज्ञ सोहळा आयोजित केला आहे. 

                   यावेळी मा. श्री.दशरथ (आप्पा) पाटील, माजी महापौर, नाशिक यांच्या हस्ते कलशपूजन, मा. श्री. मुरलीधर (आण्णा) पाटील, श्री. प्रेम दशरथ पाटील, श्री. प्रविण फकिरा पाटील, आपल्या दक्ष पोलीस वार्ता न्यूजचे उप-संपादक, श्री. भागुजी बाबा पाटील, श्री. राजाराम पाटील यांच्या हस्ते मूर्ती व ध्वजपूजन व ह.भ.प. संतदास रामनाथ महाराज धोंडगे यांच्या हस्ते दीपपूजन व वीणापूजन करण्यात आले. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील भक्तगन, श्री हरिपाठ भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ (गंगापूर, गोवर्धन) यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या नामयज्ञामध्ये महाराष्ट्रातील नामांकित प्रवचकार, ख्यातनाम कीर्तनकार, भजनी मंडळ उपस्थित होते. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन भक्ती सुखाचा आनंद घ्यावा. 

                   दि.२५/०४/२०२३ रोजी विना पूजन, ग्रंथ पूजन, कलश पूजन ध्वज उभारणी करण्यात आली. यामध्ये दररोज पहाटे ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १०:३० ते ११:३० गाथा भजन, सायं ५ ते ६ प्रवचन, ६:३० ते ७:३० हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व नंतर परिसरातील भजनी मंडळाचे जागरण भजन देखील यावेळी होत आहे व होणार आहे. तसेच दि.२५ एप्रिल रोजी ह.भ.प.शारदाताई जाधव, दि.२६ रोजी ह.भ.प.सागर महाराज दिंडे, दि.२७ रोजी ह.भ.प.शिवा महाराज आडके, दि.२८ रोजी ह.भ.प.दिगंबर महाराज किरकिडे, दि.२९ रोजी डुकळे महाराज, दि.३० रोजी ह.भ.प.विश्वनाथ महाराज कोल्हे, दि.१ मे रोजी दिंडी सोहळा व ह.भ.प.संतदास रामनाथ महाराज धोंडगे, दि.२ मे रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प.रामनाथ महाराज धोंडगे यांचे कल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होईल. यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत