अन्य

चांदवड रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ मिळणेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने चांदवड उप – विभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना निवेदन देण्यात आले

Spread the love

रवि जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , चांदवड 

              चांदवड शहरातील गोर – गरीब नागरिकांना घरकुल मिळत नसल्याने त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरांपासून वंचित रहावे लागत आहे. गोर – गरिबांना घरे नसल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबासह उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे. यामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रत्येक कष्टकरी व गोर – गरीब लोकांचे स्वप्न असते की, त्यांचे स्वतःचे घर असावे. परंतु शासनाच्या व नगरपरिषदेच्या उदासीन अधिकाऱ्यांमुळे रमाई घरकुल आवास योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने कष्टकरी जनतेला मागील अनेक वर्षांपासून घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. घरकुल मिळविण्यासाठी लोकांना फार मोठ्या संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडे व नगरपरिषदेकडे घरकुलापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा तक्रारी अर्ज करुन सुद्धा अधिकारी त्यांना उडवा उडवीची उत्तरे देतात व त्यांच्या समस्येकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहेत. यामुळे लोकांची फार मोठ्या प्रमाणात छळवणूक व पिळवणूक होत आहे.तसेच रमाई घरकुल आवास योजनेत अनेक जाचक अटी व शर्ती असल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोर – गरीब व कष्टकरी लोकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.यातील एक जरी कागदपत्र या गोर गरिब जनतेकडे नसेल तर त्यांना या घरकुल योजनेचे लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात जास्त अर्ज ज्या लोकांचे हातावरचे पोट आहे, जे लोक रात्रंदिवस काबाड कष्ट करतात ते गोर गरिब लोक अर्ज करतात. परंतु, शासन या काबाड कष्ट करणाऱ्या लोकांकडे सात बाराचे उतारे, स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेचे उतारे, घराचे उतारे व अशा अनेक कागदपत्रांची मागणी करते. जर या गोर गरिब लोकांकडे स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेचे उतारे, सात बाराचे उतारे असते तर या लोकांना घरकुल मिळविण्यासाठी अर्ज करावे लागले असते का असा प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे. शासनाने घरकुलासाठी अशा कठोर व जाचक अटी लावण्याने गोर गरिबांना घरकुलापासून कायमचे वंचित रहावे लागत आहे. यामुळे सर्व नागरिकांत अत्यंत संतप्तेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे शासनाने रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल अतिक्रमणातील व गावठाण जागेतील लोकांना देण्यात यावे.

            आता महागाई वाढल्याने घराच्या बांधकामात वापरले जाणारे साहित्यांचे दरही गगनाला भिडलेले आहेत. वाळू, विटा, स्टील, सिमेंट, फरशीचे दर व बांधकाम करणाऱ्या मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. हा विचार करता रमाई घरकुल आवास योजनेतुन घरकुल लाभार्थ्यांना मिळत असणारी रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना फक्त २,००,००० रु. ते २,५०,००० रुपये निधी मिळतो व हा निधीही टप्प्या टप्प्याने मिळतो. महागाईचा विचार करता या तुटपुंज्या रकमेत घर बांधणे अशक्यप्राय गोष्ट आहे. या कमी रकमेत घर बांधून पूर्ण होत नाही. यामुळे रमाई घरकुल आवास योजनेतील निधीत शासनाने वाढ करुन ७,००,००० रु. ते ८,००,००० रुपये घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावेत.जेणेकरुन त्यांचे स्व:मालकीचे घर बांधून तयार होईल व त्यांचे घराचे स्वप्नही पूर्ण होईल आणि गोर -गरिब व कष्टकरी लोकांना न्याय मिळेल.

               चांदवड शहरातील सर्व घरकुलापासून वंचित असणाऱ्या लोकांना तत्काळ रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल मंजूर करण्यात यावे, शासनाने रमाई घरकुल आवास योजनेतील निधीत वाढ करुन ७,००,००० रु. ते ८,००,००० रुपये देण्यात यावे व अतिक्रमणात राहणाऱ्या लोकांनाही घरकुल देण्यात यावे आणि रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेचे उतारे, सात – बाराचे उतारे, घराचे उतारे अशा कागदपत्रांची जाचक अटी व शर्ती शिथिल करण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने नगरपरिषदेचे समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी रंजना जाधव, मायाबाई जाधव, सीमा शेजवळ, मनीषा जाधव, शर्मिला अाहिरे, ज्योती जाधव, रेखा जाधव, ज्योती जाधव, प्रज्ञा जाधव, प्रमिला अाहिरे, शशिकला जाधव, सुलोचना जाधव, अलका जाधव, शुभांगी आहिरे, रोहिणी जाधव, नंदाबाई जाधव, शारदा निरभवणे, शोभा जाधव, शांताबाई जाधव, वर्षा गांगुर्डे, उषाबाई जाधव, वनिता जाधव, कल्पना जाधव, मनिंदरपालकोेैर रॉय, लता जाधव, रणदीपकोैर हुंजन, शोभाबाई जाधव, रोमा देडगे, भीमा जाधव, मीरा जाधव, रत्ना आहिरे, दादू जाधव, संजय निरभवणे, रवि बनकर, संतोष बनकर, निलेश निकम, महिला कार्यकर्त्या व सर्व कार्यकर्ते उपस्थित होत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत