अन्य

अखेर पाठपूराव्याला यश धन्यवाद नामदार रावसाहेब दादा दानवे

Spread the love

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                  भारतीय रेल्वे द्वारा सन २०१८ मध्ये मुंबई येथील रेल्वे भरतीच्या माध्यमातून सहाय्यक लोको पायलेटचे ३९८ उमेदवारांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री. दिनकर आण्णा पाटील व भारतीय जनता युवा मोर्चा, नाशिक शहर उपाध्यक्ष श्री. अमोल दिनकर पाटील यांनी पाठ पुरावा करून भारताचे केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील जवळजवळ ५०० विद्यार्थ्यांना तसेच संपूर्ण भारतातील ५८४१ विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलेट ALP या पदावर तसेच Technician च्या ११८० विद्यार्थ्यांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सदर पाठपुराव्यामुळे आज सबंध महाराष्ट्रातील व भारतातील एकूण १३००० च्या वर विद्यार्थ्यांना सेवा संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी आभार मानन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ऑडिटोरियम हॉल, सी एस टी, मुंबई या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या सर्व ALP व टेकनिकयन च्या माध्यमातून करण्यात आले. त्या कार्यक्रमाप्रसंगी भारताचे रेल्वे मंत्री ना.रावसाहेब दानवे साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री.दिनकर आण्णा पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा, नाशिक शहर उपाध्यक्ष श्री.अमोल दिनकर पाटील, रजनीश गोयल DRM साहेब, अधिकारी वर्ग व नवनिर्वाचित ALP व Technician ची मुले त्यांच्या परिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत